Take a fresh look at your lifestyle.

‘फास्टॅग’ बंद होणार..? टोलवसुलीची पद्धत आता बदलणार, जाणून घेण्यासाठी वाचा..!

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच टोलनाक्यावरील गाड्यांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वर्षभरापूर्वी ‘फास्टॅग सिस्टम’ प्रणाली आणली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नॅशनल हायवे टोलनाक्यावर 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग (FASTag) अनिवार्य केले होते. त्यानंतर सरकारने फास्टॅग बसविण्यासाठी शेवटची तारीख वाढवून 15 फेब्रुवारी 2021 केली. मागील वर्षीच सुरू केलेली ही टोल कलेक्शनची पद्धत आता बदलण्यात येणार असल्याची माहिती मिळाली..

Advertisement

वर्षभरापूर्वी लाखो वाहनांवर लावलेले फास्टॅग हटवण्याची शिफारस आता संसदीय समितीने केली आहे. परिवहन आणि पर्यटनाशी संबंधित स्थायी समिती अध्यक्ष टी. जी. व्यंकटेश यांनी संसदेत याबाबतचा एक अहवाल सादर केला. त्यात म्हटलंय की फास्टॅगद्वारे टोलवसुली न करता, आता जीपीएस पद्धतीने (GPS Toll Collection) टोल भरण्याची व्यवस्था लागू होईल. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचंही सांगण्यात आलं.. अनेकदा फास्टॅग ‘रिड’ करताना अडचणी येत होत्या. वेळ वाचण्याऐवजी उलट त्यात वेळ वाया जात असल्याचं लक्षात आल्याने लवकरच फास्टॅग बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं..

Advertisement

दरम्यान, याआधी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीही फास्टॅग बंद केले जाणार असल्याची माहिती दिली होती. भारतातील सर्व टोलनाक्यावरील फास्टॅग वर्षभरात हटवले जाणार असून, त्याऐवजी नव्या जीपीएस आधारित प्रणालीनुसार टोल भरावा लागेल.. या पद्धतीमुळे जितक्या रोडचा वापर करण्यात आला, तेवढाच टोल वाहनधारकांना द्यावा लागणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले होते.

Advertisement

जीपीएस प्रणालीबाबत..
टोल वसुलीसाठी आता जीपीएस बेस्ड टोल सिस्टम लागू होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीपीएस, वाहन ट्रॅकिंग डिव्हाईस किंवा ट्रान्सपोंडरसह फिट करावं लागेल. जीपीएस इमेजिंगच्या मदतीने तुमच्या प्रवासाच्या आधारे तुमचा टोल आकारला जाईल. शिवाय टोल वसुलीसाठी जीपीएस ट्रॅकिंगचा उपयोग केल्यास, तुमच्या प्रवासाचे सर्व डिटेल्स ट्रॅक केले जाऊ शकतात.

Advertisement

जीपीएस तंत्रज्ञानामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल, प्रवासाचा वेळ वाचेल, तसेच इंधन बचतही होईल. देशभरात महामार्गांवर टोल वसुलीसाठी टोल नाके उभारावे लागणार नाही. त्यामुळे खर्चही कमी होईल, शिवाय चालकाच्या बॅंक खात्यातून थेट पैसे कट होणार असल्याचे असे टी. जी. व्यंकटेश यांनी सांगितलं..

Advertisement

आजची रेसिपी : केवळ मंचुरियनच नव्हे कोबीपासून बनवा कोफ्ता.. प्रत्येकजण विचारेल रेसिपी
बाब्बो… प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे वाढतो लठ्ठपणाचा धोका… जाणून घ्या काय म्हटले संशोधनात

Advertisement
Advertisement

Leave a Reply