Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोने खरेदीची ‘सुवर्ण’संधी..! बजेटनंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण…

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या बजेटनंतर शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. दुसरीकडे सोन्यात गुंतवणूक करण्याचीही चांगली संधी आली आहे. कारण, गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आजही सोने दरात(Gold Price Today) घसरण झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर(MCX) आज एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा भाव 0.25 टक्क्यांनी घसरला, तर चांदीचा भाव (Silver price) 0.01 टक्क्यांनी घटला आहे.

Advertisement

एप्रिल डिलीव्हरी सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे, तर चांदीमध्ये 0.01 टक्के घसरण झाली. आज एक किलो चांदीचा भाव 61,351 रुपये आहे. 2020 मध्ये याच कालावधीत ‘एमसीएक्स’वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर होता. ‘एमसीएक्स’वर आज सोन्याचा डिसेंबर वायदे भाव 47,792 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सर्वोच्च स्तरावरुन सोने अद्यापही 8400 रुपये स्वस्त मिळत आहे.

Advertisement

कोरोना संकटातही सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली असून, त्यामुळे सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते

Loading...
Advertisement

दरम्यान, आता तुम्ही घरबसल्या सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, त्यात तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

Advertisement

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

Advertisement

हेल्थ टिप्स : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात तुम्हीही अशा चुका तर करत नाही ना.. फायद्याऐवजी होऊ शकतो तोटा
शेअर बाजारात तेजी कायम, केंद्राच्या बजेटवर गुंतवणूदार खूश..

Advertisement
Advertisement

Leave a Reply