Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या बजेटवर राष्ट्रवादीची जोरदार टीका; एकाच वाक्यात सांगितलेय बजेट ‘कसे’ आहे ते..

मुंबई : केंद्र सरकारने आज अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या बजेटवर राजकीय विश्वातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेत्यांनी या बजेटचे कौतुक केले आहे तर विरोधी पक्षांनी मात्र टीकेची झोड उठवली आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारच्या या बजेटवर टीका केली आहे. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र, सर्वसामान्य करदात्यांना कोणताही नव्याने दिलासा देणारी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रक्रिया दिली आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटमध्ये पाटील यांनी केवळ एकच वाक्य लिहीले आहे. ‘अर्थसंकल्प नव्हे, निवडणूक संकल्प’ या वाक्यात त्यांनी सरकारच्या या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. देशातील 5 राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. येत्या काही दिवसांत या निवडणुकीसाठी मतदान सुद्धा होणार आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हा अर्थसंकल्प सादर केला असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

Advertisement

दरम्यान, या अर्थसंकल्पात सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. तसेच काही नवीन निर्णयही जाहीर केले आहेत. मात्र, सर्वच विरोधी पक्षांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. या अर्थसंकल्पात नवीन असे काहीच नाही. करदात्यांनाही सरकारने कोणताच दिलासा दिलेला नाही. ऑटो क्षेत्रासाठीही फारशा घोषणा केलेल्या नाहीत, अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले, की सर्वव्यापी, सर्व घटकांना काही तरी देण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये केला आहे. उद्योगांना चालना देणारे बजेट, करांमध्ये सुधारणा आहे. पायाभूत सुविधांवर भर, रस्ते, रेल्वे, हवाई मार्गावर भर देण्यात आला आहे. आर्थिक विकास आणि बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. याचा देशाच्या आर्थिक प्रगतीवर भर दिला आहे.

Advertisement

फडणविसांनी बजेटवर उधळलीय ‘अशी’ स्तुतिसुमने; पहा कसे बेस्ट वाटलेय त्यांना हे

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply