Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आयपीएलमुळे रणजी ट्रॉफी स्पर्धा होणार दोन टप्प्यात; बीसीसीआयने जाहीर केले वेळापत्रक

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा 16 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत होणार आहे. बीसीसीआयने रणजी ट्रॉफीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. देशातील कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, क्रिकेट मंडाळाने ही देशांतर्गत सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलली होती. आधीच्या वेळापत्रकानुसार 13 जानेवारीपासून सामने सुरू होणार होते. मात्र, कोरोनामुळे नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धा घेता आली नाही.

Advertisement

रणजी ट्रॉफीमध्ये 38 संघ सहभागी होणार असून त्याचे सामने 8 शहरांमध्ये होऊ शकतात. वृत्तानुसार रणजी सामने अहमदाबाद, कोलकाता, त्रिवेंद्रम, कटक, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद आणि राजकोट येथे होणार आहेत. रणजी ट्रॉफीचा फॉरमॅट बीसीसीआयने बदलला आहे आणि त्यात चार संघांचे आठ गट असतील, ज्यामध्ये प्लेट गटात सहा संघ असतील. मार्च 2020 मध्ये रणजी ट्रॉफी फायनल पार पडल्यानंतर देशांतर्गत राष्ट्रीय पातळीवरील कोणताही सामना झालेला नाही.

Advertisement

रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात लीग स्तरीय सामने होतील आणि बाद फेरीचे सामने जूनमध्ये होतील.’आयपीएल 2022 क्रिकेट स्पर्धा 27 मार्चपासून होणार आहे आणि अशा परिस्थितीत जून आणि जुलैमध्ये रणजी ट्रॉफीचे बाद फेरीचे सामने आयोजित केले जातील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले होते.

Loading...
Advertisement

दरम्यान, कोरोनामुळे आधी स्पर्धा स्थगित करावी लागली होती. त्यानंतर आता स्पर्धा होणार आहे. मात्र, दोन टप्प्यात होणार आहे. बोर्डाने असा निर्णय घेण्यामागे महत्वाचे कारण आयपीएल ठरले आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धा 27 मार्चपासून सुरू होतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रणजी क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यात आयोजित करण्याचा निर्णय क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

Advertisement

ठरलं तर..! आता ‘या’ दिवसापासून सुरू होणार रणजी ट्रॉफी.. पहा, काय आहे क्रिकेट मंडळाचे नियोजन

Advertisement
Advertisement

Leave a Reply