मुंबई : भारताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण उद्या (ता. 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी आज, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली आहे. सकाळीच सेन्सेक्स 724.1 अंकांनी वधारला असून, निर्देशांक 57,924.33 अंकांवर पोहोचला. निफ्टीतही 216.35 अंकांनी वाढ झाली असून, सध्या निफ्टी 17318.30 अंकांवर आहे. संसदेत आज आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार असून, त्यात 9 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त होत आहे..
2022 मध्ये भारताचा विकासदर (जीडीपी) 9 ते 9.5 टक्के राहण्याची शक्यता सर्व्हेतून समोर आली आहे. या वर्षातही महागाई वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारात सध्या तेजी दिसत आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडताच 693 अंकांनी उसळी घेतली. सेन्सेक्सने 1.3 टक्क्यांच्या वाढीसह 57 हजार 936.35 वर मजल मारली. त्यानंतर निफ्टीतही वाढ होऊन निर्देशांक 17301 अंकांवर पोहोचला.
निफ्टीही ‘ग्रीन झोन’मध्ये दिसला, तर त्याच्या 3 शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसले. बँक निफ्टीतही 1.08 टक्क्यांची वाढ झाली असून, तो 38,097 पर्यंत पोहोचला होता. विप्रो निफ्टीच्या 3.36 वाढीसह असून, ‘ओएनजीसी’मध्ये 3.29 टक्क्यांची वाढ झाली. शिवाय टेक महिंद्रा, टायटन आणि Divi’s Lab सुद्धा ग्रीन झोनमध्ये आहेत.
मागील दोन आठवड्यांपासून शेअर बाजारात (Share Market) घसरण सुरु होती. त्यामुळे गुंतवणूकदारही (Investors) दबावाखाली होते. अर्थसंकल्पाआधी शेअर बाजाराची स्थिती कशी असेल, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, आज सकाळची सुरुवात चांगली झाली आहे.
आजची रेसिपी : घरीत तयार करा हॉटेल स्टाइल पनीर कोरमा.. ही आहे अगदी सोपी रेसिपी..
प्रेमीयुगुलांसाठी आलाय व्हॅलेंटाईन वीक : जाणून घ्या एक एक दिवस कसा असतो स्पेशल