Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील महिला उद्याेजकांना चालना मिळणार.. राज्यातील गुंतवणूक वाढणार..

मुंबई : महाराष्ट्रातील महिला उद्योजकांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक व महिला उद्योजकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील 6 विभागांत महिला व अॅग्रोबेस क्लस्टरची (Agro based cluster) निर्मिती केली जाणार आहे. स्थानिक व्यापार, उद्योगांना निर्यातीसाठी चालना देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे (Maharashtra chamber of commerce) नुकतेच जाहीर करण्यात आले.

Advertisement

भारत-लिमा (पेरू आणि बोलिव्हिया) महावाणिज्यदूत कार्यालय, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इंडिया-पेरू चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यात नुकतीच बैठक झाली. त्यात महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यावर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र भारतातील पहिली एक ट्रिलियन डॉलर (एक लाख कोटी डॉलर) अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष असल्याचा निर्धारही करण्यात आला.

Loading...
Advertisement

महाराष्ट्रातील निर्यात वाढविण्यासाठी व जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने दक्षिण कोरिया, तैवान, थायलंडचे दौरे केले. विविध देशातील आंतरराष्ट्रीय संघटना व चेंबर ऑफ कॉमर्सबरोबर 27 सामंजस्य करार केले आहेत. राज्यातील व्यापार व्यवसाय वाढावा, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढावी, नवीन व्यापार-उद्योग यावेत, यासाठी चेंबरतर्फे राज्यात उद्योग, धोरणकर्ते, बँक, वित्तीय संस्थांमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. भारत – लिमा (पेरू आणि बोलिव्हिया) व्यापार उद्योगांसाठी द्विपक्षीय करार झाला असून, त्यात अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.

Advertisement

‘बिग बाॅस-15’च्या विजेतेपदावर या अभिनेत्रीने नाव कोरले.. असा रंगला ‘ग्रॅंड फिनाले’..!
BUDGET 2022 निमित्त अजब-गजब : म्हणून तिथे सेक्स आणि मृत्यूवरही द्यावा लागला होता टॅक्स..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply