Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आता ‘या’ कारमध्येही बसविता येणार सीएनजी कीट.. मोदी सरकारचा मोठा निर्णय..!

मुंबई :  सततच्या इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.. आता ‘बीएस-6’च्या कारलाही ‘सीएनजी’, ‘एलपीजी’ किट लावता येणार आहे. केंद्र सरकारने काही अटींवर या वाहनांना हे कीट लावण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच एक अधिसूचना जारी केली. त्यात ‘बीएस- VI’ वाहनांच्या इंजिनमध्ये बदल करून ‘सीएनजी’ किंवा ‘एलपीजी किट’ रेट्रोफिटिंग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्या गाड्यांचे वजन 3.5 टनांपेक्षा कमी आहे, अशा पेट्रोल गाड्यांमध्ये हा बदल करता येणार असल्याची अट आहे..

Advertisement

‘बीएस-6’ मानके असणाऱ्या गाड्या दोन वर्षांपूर्वी रस्त्यावर आल्या. त्यामुळे सध्या तरी रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक कार या ‘बीएस-4’च्या आहेत. याआधी पेट्रोलवरील ‘बीएस-4’ कारमध्ये ‘सीएनजी’ कीट बसवता येत होते.. मात्र, आता नव्या ‘बीएस-6’ची वाहनेही ‘सीएनजी’मध्ये बदलता येणार आहेत. अर्थात, त्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. एकदा कारमध्ये ‘सीएनजी’मध्ये रेट्रोफिटिंग केले, की तीन वर्षे बिनदिक्कत कार चालविता येणार आहे. त्यानंतर तीन वर्षांनी पुन्हा एकदा ‘सीएनजी’ परवाना रिन्यू करावा लागेल.

Advertisement

दरम्यान, ‘रेट्रोफिटिंग’ किट लावण्यासाठी इंजिनाची क्षमताही निर्धारित केली आहे. त्यासाठी 1500cc ची इंजिन क्षमता असलेल्या कार सीएनजी, एलपीजीमध्ये बदलता येतील. त्यासाठी ±7% आणि 1500 सीसीच्या वर ±5% क्षमतेची इंजिने गृहीत धरली आहेत. इंजिनची ताकद ही वेळोवेळी इंजिन डायनॅमोमीटरवर मोजली जाणार आहे. ‘सीएनजी’वर मोजण्यात आलेली ताकद -15% ≤ पेट्रोलवर मापली गेलेली ताकद ही सीएनजीपेक्षा ≤+5% च्या लिमिटमध्ये असेल, तरच सीएनजी कीट बसवण्यास परवानगी दिली जाणार आहे.

Loading...
Advertisement

‘बीएस-VI’ मानके असणारी वाहने दोन वर्षांत आली. नवी कार घेताना कंपन्या कमीत कमी 3 ते 5 वर्षांची वॉरंटी देतात. त्यामुळे कार मालक कारची वॉरंटी धोक्यात घालून ‘सीएनजी रेट्रोफिट’ करण्याची शक्यता फार कमी आहे. सरकारने आज हा निर्णय घेतला असला, तरी आणखी दोन-तीन वर्षांनी कारमालक ‘सीएनजी’ पर्याय स्वीकारु शकतात.. शिवाय पेट्रोल कारसाठी ‘सीएनजी’ किट बसविण्यासाठीही 50 हजारापेक्षा अधिक खर्च येणार आहे.

Advertisement

‘बिग बाॅस-15’च्या विजेतेपदावर या अभिनेत्रीने नाव कोरले.. असा रंगला ‘ग्रॅंड फिनाले’..!
प्रेमीयुगुलांसाठी आलाय व्हॅलेंटाईन वीक : जाणून घ्या एक एक दिवस कसा असतो स्पेशल

Advertisement
Advertisement

Leave a Reply