Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘बिग बाॅस-15’च्या विजेतेपदावर या अभिनेत्रीने नाव कोरले.. असा रंगला ‘ग्रॅंड फिनाले’..!

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक म्हणजे.. ‘बिग बॉस’..! रविवारी (ता. 30) रात्री ‘बिग बॉस’ हिंदीच्या 15 व्या पर्वाचा ‘ग्रॅंड फिनाले’ पार पडला.. यंदाच्या 15 व्या पर्वात ‘बिग बॉस’ हिंदीचा विजेता कोण होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर रविवारी रात्री उशिरा ‘बिग बॉस’ हिंदीच्या 15 व्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या ‘बिग बॉस’ हिंदीच्या 15 व्या पर्वाची विजेती ठरली. तिला ‘बिग बॉस’ची ट्रॉफी नि 40 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

Advertisement

‘बिग बॉस’च्या 15 व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळा जोरदार रंगला. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. बिग बॉसच्या या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या सोहळ्यासाठी उपस्थित होते. सर्वच स्पर्धकांनी नृत्याविष्कार करीत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Advertisement

‘बिग बॉस’च्या टॉप-6 मध्ये तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट यांच्यात स्पर्धा होती. पण, टॉप-6 मध्ये आल्यानंतर रश्मी देसाई हिला कमी मतांमुळे बाहेर व्हावे लागले.. तर निशांत भट्टने 10 लाख रुपये घेत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल असे चौघे घरात शिल्लक राहिले. त्यात तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा हे तिघे टॉप-3 स्पर्धक ठरले.

Loading...
Advertisement

प्रतीक नि तेजस्वीने टॉप-2 मध्ये प्रवेश केला. अखेर सूत्रसंचालक अभिनेता सलमान खानने तेजस्वी प्रकाशला यंदाच्या ‘बिग बॉस’ची विजेती म्हणून घोषित केले. प्रतीक हा या शोचा ‘रनरअप’ ठरला. तेजस्वी प्रकाशला ‘बिग बॉस’-15व्या सिझनची ट्रॉफी व सोबत 40 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले.

Advertisement

‘बिग बॉस’मध्ये आल्याचे तेजस्वीला तीन फायदे झाले. एक तर ती या ‘शो’ची विजेती ठरली. दुसरा फायदा म्हणजे, आता ती एकता कपूरच्या ‘नागिन-6’ या आगामी मालिकेत नागिनच्या रुपात दिसणार आहे. तिसरा फायदा म्हणजे तिचे करण कुंद्राचे रिलेशनशिप.. ‘बिग बॉस-15’ची विजेती ठरल्यावर तिने कुटुंबासह चाहत्यांचे नि करण कुंद्रा याचेही आभार मानले.

Advertisement

BLOG : गांधी आमचा कोण लागतो?
चीन दौऱ्याआधीच पाकिस्तानला बसलाय झटका.. रशियाने केलेय ‘असे’ काही; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply