Take a fresh look at your lifestyle.

महिला पोलिसांसाठी आनंदाची बातमी..! ठाकरे सरकारने कामाबाबत घेतला मोठा निर्णय..

मुंबई : महाराष्ट्रातील महिला पोलिसांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाकरे सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता महिला पोलिसांसाठी कामाची वेळ 12 तासांवरून 8 तास करण्यात आली आहे.

Advertisement

पोलिस दलात कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांवर आपल्या ड्युटीबरोबरच कौटुंबीक जबाबदारीचा भारही आहे. सण-उत्सवात बंदोबस्त, गंभीर गुन्ह्यांच्या निमित्ताने वर्षभरात अनेक वेळा 12 तासांपेक्षा जास्त वेळ त्या कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांच्या कौटुंबीक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यांच्यावरील मानसिक ताण वाढला होता. काही महिला पोलिसांनीही ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती.

Advertisement

राज्य सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 तासांवरून 8 तासांवर आणण्याचा निर्णय सप्टेंबर-2021 मध्येच घेतला होता. मात्र, काही ठिकाणीच त्याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात येत होती. आता सगळीकडे प्रायोगिक तत्त्वावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेश पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिला आहे.

Advertisement

नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर 8 तास ड्यूटी दिल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी 8 तासांची ड्यूटी जाहीर केली. त्यापाठोपाठ अमरावती व नुकतीच नवी मुंबई पोलिसांनीही या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली होती. अखेर राज्य पातळीवर निर्णय घेण्यात आला असून, आता राज्यातील महिला पोलिसांना 8 तासांची ड्यूटी करता येणार आहे.. त्यायामुळे महिला पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आता कुटूंबाला अधिक वेळ देता येणार आहे.

Advertisement

राज्यात प्रायोगिक तत्वावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement

कोण होणार भारताचे पुढील राष्ट्रपती..? भाजपमधील ‘या’ दिग्गजांची नावे चर्चेत..!
सरकारी नोकऱ्यांतील पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टाचा महत्वाचा निर्णय..

Advertisement
Advertisement

Leave a Reply