Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Election 2022 : ‘त्या’ हेलिकॉप्टर प्रकरणावर सरकारनेही दिलेय स्पष्टीकरण; पहा, नेमका काय आहे वाद..?

दिल्ली : उत्तर प्रदेशातील निवडणुकीत राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. कोरोनाचा धोका असल्याने निवडणूक आयोगाने जाहीर सभा, रॅलींना मनाई केली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष डिजिटल प्रचारावर भर देत आहेत. अशातच आता हेलिकॉप्टर प्रकरणाने जोर धरला आहे. आता या प्रकरणात सरकारी सूत्रांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे हेलिकॉप्टर मुद्दामून नाही तर इंधन भरण्यासाठी थांबवण्यात आले होते. इंधन भरल्यानंतर त्यांना तातडीने उड्डाणाची परवानगी दिली, असे सांगण्यात आले.

Advertisement

याआधी अखिलेश यादव यांनी मात्र केंद्र सरकावर त्यांचे हेलिकॉप्टर मुद्दाम रोखून धरल्याचा आरोप केला होता. अखिलेश त्यांच्या वेळापत्रकानुसार दुपारी एकच्या सुमारास मुझफ्फरनगरमध्ये त्यांची पत्रकार परिषद होती. मात्र, दुपारी अडीच वाजेपर्यंत ते दिल्लीतच होते. त्यानंतर काही वेळानंतर ते मुझफ्फरनगरकडे रवाना झाले.

Advertisement

या प्रकरणी त्यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर आरोप केला होता. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, की माझे हेलिकॉप्टर कोणतेही कारण न देता दिल्लीमध्ये रोखून धरण्यात आले आहे. मला मुजफ्फरनगरला जाऊ दिले जात नाही. भारतीय जनता पार्टीचा एक वरिष्ठ नेता आताच येथून रवाना झाला आहे. पराभव होत असलेल्या भारतीय जनता पार्टीचा निराशेने भरलेला कट आहे. जनतेला सर्व समजत आहे. असे त्यांनी म्हटले होते.

Loading...
Advertisement

यानंतर परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केले होते. या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी आता हेलिकॉप्टर उड्डाण घेत असल्याचे म्हटले. सत्तेचा दुरुपयोग हा पराभव होत असलेल्या लोकांचे चिन्ह आहे. समाजवादी संघर्षाच्या इतिहासात हा दिवस नोंद होईल, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement

एकूणच, राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. निवडणुकीसाठी राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करत आहेत. तसेच डिजिटल प्रचारालाही वेग आला आहे. निवडणूक आयोगाने 31 जानेवारीपर्यंत ऑफलाइन प्रचारास बंदी केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना जास्तीत जास्त ऑनलाइन प्रचार करावा लागत आहे. या राज्यात एकून सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी निकाल घोषित होणार आहेत.

Advertisement

अर्र.. उत्तर प्रदेश निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री; ‘त्या’ मुद्द्यावर भाजपने अखिलेश यादव यांच्यावर केलीय जोरदार टीका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply