Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उसळी घेतल्यानंतर पुन्हा शेअर बाजार कोसळला.. प्रॉफिट बुकिंगमुळे घसरण..

मुंबई : भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवसही निराशाजनकच ठरला.. आज (शुक्रवारी) सकाळी भांडवली बाजारात सकारात्मक चित्र दिसत होते. आशियाई मार्केट घसरणीनंतर सावरत असताना, त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवरही दिसला.. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज (BSE) जवळपास 579 अंकांनी वर 57,856 पर्यंत गेले होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) 153 अंकांनी वर जाऊन 17, 263 अंकावर पोहचले होते. मात्र, दुपारपर्यंत हा ट्रेंड बदलत गेला. वरच्या स्तरांवर मोठ्या प्रमाणात नफावसुली झाल्यामुळे फेब्रुवारीच्या सीरिजच्या पहिल्या दिवशी बाजारात प्री-बजेट रॅली दिसली. सेन्सेक्स निफ्टीने दिवसभरातील सर्व नफा गमावला आणि लाल चिन्हावर बंद झाला.

Advertisement

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसली. फार्मा, ऑईल अॅण्ड गॅस, रिअॅलीटी, आयटी शेअर्समध्येही खरेदी झाली. बँकिंग, कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग झाली. बाजार बंद होताना, सेन्सेक्स 77 अंक किंवा 0.13 टक्क्यांनी घसरून 57,200 वर बंद झाला, तर निफ्टी 8 अंक किंवा 0.048 टक्क्यांनी घसरून 17,102 वर बंद झाला. निफ्टी बँक 293 अंकांनी घसरून 37,689 वर बंद झाला. मिडकॅप 440 अंकांनी वाढून 29,805 वर बंद झाला.

Advertisement

‘बीएसई सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी-50’ शुक्रवारी एक टक्क्यांहून अधिक वाढले. एनटीपीसी, महिंद्रा अँड महिंद्रा (एमएंड), इंडस इंड बँक, विप्रो, टाटा स्टील, सन फार्मा, टेक महिंद्रा, आरआयएल हे बीएसई सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढले.

Advertisement

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी), एचडीएफसी बँक आणि भारती एअरटेल या 30 शेअर्सच्या निर्देशांकांचे नुकसान झाले. निफ्टी रियल्टी, निफ्टी आयटी, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 1-2% च्या श्रेणीत वाढल्याने सर्व निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करीत होते.

Loading...
Advertisement

या शेअर्समध्ये वाढ
सन फार्मा, इंडस इंड बॅंक, एम अॅण्ड एम, विप्रो, आयटीसी, भारती एअरटेल, टीसीएस, एचडीएफसी, कोटक बॅंक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टायटन, एचसीएल टेक या शअर्समध्ये वाढ दिसली..

Advertisement

या शेअर्समध्ये घसरण
टेक महिंद्रा, पाॅवर ग्रिड, आयसीआयसीआय बॅंक, अॅक्सिस बॅंक, एसबीआय, बजाज फायनान्स, डाॅ. रेड्डी, एचडीएफसी बॅंक, एलटी, एचयूएल, टाटा स्टील, एशियन पेंटस्, नेस्ले इंडिया या शेअर्समध्ये आज घसरण झाली.

Advertisement

सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही गडगडली.. गुंतवणूकदार धास्तावले..
बटाटे उकडतील झटपट… फक्त या सोप्या किचन टिप्सचे करा अनुसरण

Advertisement
Advertisement

Leave a Reply