Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुद्द्यावर आघाडी सरकारने दिलीय पहिली प्रतिक्रिया.. पहा, काय म्हणालेत मंत्री जयंत पाटील..?.

मुंबई : राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या मुद्द्यावर आता राजकीय विश्वातून प्रतिक्रिया येत आहेत. न्यायालयाच्या या निकालाने सत्ताधारी महाविकास आघाडीस एक प्रकारे धक्का बसला आहे तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदा घेत राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. या मुद्द्यावर आता राज्य सरकारच्या बाजूनेही प्रतिक्रिया येत आहे.

Advertisement

सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बारा आमदारांचे निलंबन रद्द झाले, या न्यायालयाच्या निकालाची प्रत येईल. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष विधानसभा कार्यालय याबाबत अभ्यास करील आणि योग्य तो निर्णय घेईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. आमदारांच्या वागणुकीनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. 170 पर्यंत आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत, त्यामुळे बारा जण निलंबित करुन कृत्रिम बहुमत तयार करण्याची गरज आम्हाला कधीच वाटली नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत राज्यपालांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही, वर्ष उलटून गेले. सर्व कायद्याच्या चौकटीत बसून व्हायला हवे, असे आम्हाला अपेक्षित आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Advertisement

दरम्यान, याआधी जुलै महिन्यात विधानसभेत भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. या निर्णयास भाजप आमदार आशिष शेलार आणि इतरांना सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी होऊन सर्व युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज या प्रकरणात निकाल दिला आहे. या निकालामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजप नेत्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका सुरू केली आहे.

Advertisement

मोठी बातमी..! भाजपच्या निलंबित 12 आमदारांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय..

Advertisement
Advertisement

Leave a Reply