Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

उत्तर प्रदेश विधानसभेसाठी ‘आम आदमी’ चे घोषणापत्र.. वाचा काय काय देणार मोफत..?

दिल्ली : आम आदमी पार्टी (AAP) ने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाने त्याला ‘आम आदमीचे हमी पत्र’ असे नाव दिले आहे. या हमी पत्रात पक्षाने 300 युनिट मोफत वीज, जुनी बिले माफ, बजेटच्या 25 टक्के शिक्षणावर खर्च, 5000 रुपये बेरोजगार भत्ता, दरवर्षी 10 लाख नोकऱ्या, ऊस आणि धान्य पेमेंट आदी 24 तासांच्या आत केले जाईल, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा आणि जुनी कर्जे माफ केली जातील, अशी आश्वासने या जाहीरनाम्यात दिली आहेत.

Advertisement

पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह म्हणाले की, आम आदमी पक्षाचा जाहीरनामा हा जुमला नाही, दिखाऊपणा तर आजिबात होत नाही. आम आदमी पक्षाचा जाहीरनामा हा हमीपत्र आहे. ते जे काही वचन देतात ते पूर्ण करतात. हा आमचा उत्तर प्रदेशच्या जनतेबरोबर0करार आहे. सरकार आल्यानंतर 300 युनिट वीज मोफत दिली जाईल, सर्व जुनी बिले माफ करून 24 तास वीज दिली जाईल.

Advertisement

सरकार स्थापन झाल्यानंतर दरवर्षी १० लाख रोजगार दिले जातील. नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारांना दरमहा 5 हजार रुपये देणार, शेतकऱ्यांची जुनी थकीत सर्व कर्जे माफ केली जातील. सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्पातील 25 टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करणार आहोत. दरवर्षी उसाच्या भावात वाढ होईल, उसाचे पेमेंटही शेतकऱ्याला तातडीने केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Loading...
Advertisement

या जाहीरनाम्यात 300 युनिट वीज मोफत देणार, शेतकऱ्यांना मोफत वीजही दिली जाणार असून जुनी बिले माफ करण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पातील 25 टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करणार, सरकारी शाळांची परिस्थिती सुधारून खासगी शाळांपेक्षा चांगली केली जाईल. दरवर्षी 10 लाख रोजगार देणार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी 24 तासांत दिली जाईल.

Advertisement

शेतमालाचे पेमेंट 24 तासांत केले जाईल. महिनाभरात 97000 शिक्षकांची भरती करणार, खासगी शिक्षकांना किमान 25000 मानधन देणार, जुनी पेन्शन योजना पूर्ववत केली जाईल. सर्व औषधे, चाचण्या, ऑपरेशन्स मोफत होणार, वकिलांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत जीवन विमा तसेच गावागावात दवाखाने सुरू करणार, अशी अनेक आश्वासने आम आदमी पक्षाने या जाहीरनाम्यात दिली आहेत.

Advertisement

पंजाब विधानसभेसाठी केजरीवालांचे घोषणापत्र…वाचा काय देणार मोफत….

Advertisement
Advertisement

Leave a Reply