Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी..! भाजपच्या निलंबित 12 आमदारांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा निर्णय..

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षासाठी मोठी बातमी आहे.. भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.. याप्रकरणी सुप्रिम कोर्टाने ठाकरे सरकारवर जोरदार ताशेरेही ओढले.. राज्य सरकारचा हा निर्णय असंवैधानिक असल्याचे सांगत कोर्टाने आमदारांचे निलंबन रद्द केलं आहे. तसेच, निलंबन फक्त एका अधिवेशनापुरतंच असायला हवं होतं, असंही सांगितलं. न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजप आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे..

Advertisement

नेमकं काय झालं होतं..?
राज्याच्या पावसाळी अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी ‘ओबीसी’ राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात अभूतपूर्व गोंधळ उडाला होता. नंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांचे आमदार आमने-सामने आले. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांवर एका वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.. त्यामध्ये अतुल भातखळकर, राम सातपुते, आशिष शेलार, संजय कुटे, योगेश सागर, किर्तीकुमार बागडिया, गिरीश महाजन, जयकुमार रावल, अभिमन्यू पवार, पराग अळवणी, नारायण कुचे, हरिश पिंपळे या आमदारांचा समावेश होता.

Advertisement

दरम्यान, हे निलंबन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदारांमार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बऱ्याच दिवसांपासून सुनावणी सुरु होती. गेल्या सुनावणीत हा निर्णय लोकशाहीला धोका देणारा आणि तर्कहीन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आर्यमा सुंदरम यांना अधिवेशन कालावधीनंतरच्या निलंबनाच्या तर्कसंगतीबद्दल कोर्टाने कठोर प्रश्न विचारले होते.

Loading...
Advertisement

कोर्टाने काय म्हटलंय..?
न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार म्हणाले, की, “मतदारसंघात जागा रिक्त असल्यास तिथे निवडणूक घेता येते, पण निलंबन झाल्यास निवडणूकही होणार नाही, परंतु एखाद्या आमदाराची हकालपट्टी झाल्यास निवडणूक घेतली जाईल. हा लोकशाहीला धोका आहे. एकाच वेळी 15/20 लोक निलंबित झाल्यास, लोकशाहीचे भवितव्य काय असेल..?”

Advertisement

market news : बाजारात तेजीचे वारे; पहा कितीने वाढलेत शेअर्स सूचकांक
IPLचा सर्वात महागडा खेळाडू अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, आता होणार या संघाचा कोच

Advertisement
Advertisement

Leave a Reply