Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘टाटां’च्या कार्यकर्तृत्वावर लवकरच वेबसीरिज येणार.. रतन टाटांच्या भूमिकेत कोण, वाचा..

मुंबई : टाटा उद्योग समूह.. भारतातील आघाडीचा उद्योजक समूह.. आपल्या उद्योगाबरोबरच टाटा कुटुंबाचे सामाजिक कार्यातही नेहमीच योगदान असते. टाटा कुटुंबाबद्दल, या उद्योग समूहाबद्दल अनेकांच्या मनात कुतूहुल असते.. त्यावर बरीचशी पुस्तकेही आली आहेत. मात्र, आता ‘टाटां’चे हे कार्यकर्तृत्व, उद्याेगाची सुरुवात ते भरभराट कशी झाली, याची माहिती वेबसिरीजद्वारे समोर येणार आहे. टाटा कुटुंबाच्या आजवरच्या प्रवासावर वेब सीरिजच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. गेल्या 200 वर्षांमध्ये टाटा कुटुंबाने केलेल्या कार्याचा आढावा वेबसीरिजच्या माध्यमातून घेतला जाणार आहे.

Advertisement

ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर लिखित ‘द टाटाज : हाऊ अ फॅमिली बिल्ट ए बिझनेस अ‍ॅण्ड अ नेशन’ या पुस्तकावर आधारित ही वेबसीरिज असेल. त्यासाठी पुस्तकाचे हक्क विकत घेण्यात आले आहेत. ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.. ‘अल्मायटी मोशन पिक्चर’ या प्राॅडक्शन हाऊसच्या प्रभलीन कौर संधू यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या सीरिजचे किमान तीन सिझन असतील, असे त्यांनी सांगितलं..

Advertisement

रतन टाटांच्या भूमिकेत कोण..?
वेबसीरिजच्या चित्रीकरणाला पुढील 6 ते 7 महिन्यांत सुरुवात होणार आहे. सीरिजचे कथानक लिहून झाल्यानंतर त्यासाठी कास्टिंग केलं जाईल. रतन टाटा यांची भूमिका कोण साकारणार..? इतर भूमिका कोण साकारणार, हे कथानक लिहून झाल्यानंतर निश्चित केलं जाईल, असे सांगण्यात आलं. “एवढ्या प्रदीर्घ प्रवासाची कथा सांगण्यासाठी संपूर्ण संशोधन करणार आहोत. एका टीमला स्क्रिप्ट लिहिण्याचं काम दिलं आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात होईल..,” असं सांगण्यात आलं.

Loading...
Advertisement

वेबसीरिजमध्ये केवळ ‘टाटा सन्स’चे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचाच प्रवास दाखवला जाणार नाही, तर त्यांच्या पूर्वजांचा, त्यांच्या संपूर्ण पारशी कुटुंबाच्या इतिहासाचा आढावा घेतला जाणार आहे. सीरीजच्या लेखनाचं काम सुरु झालंय. पुस्तकात कथन केलेल्या कथानकाप्रमाणेच या सिरीजचं कथानक असेल, असं समजते..

Advertisement

सीरिजमध्ये काय..?
“टाटा कुटुंबाने सशक्त समाज बांधणीसाठी कसे योगदान दिले, यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. सीरिजमधून केवळ टाटांनी एक मोठा उद्योग समूह कसा उभा केला, तसेच राष्ट्र उभारणीत कसे योगदान दिले, हेही दाखवलं जाणार आहे,” असे संधू म्हणाल्या.

Advertisement

आज देशभरात इतके कोरोनाचे रुग्ण सापडले.. जगभरातही कोरोनाचे थैमान सुरूच; जाणून घ्या, कोरोना अपडेट
महाराष्ट्रातील थंडीची लाट कधी ओसणार..? हवामान खाते काय म्हणतंय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply