Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो… महाराष्ट्रातील तब्बल इतके शिक्षक बोगस.. टीईटी घोटाळ्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर..

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एका घोटाळ्याची जोरदार चर्चा आहे. तो म्हणजे, टीईटी घोटाळा.. राज्यात शिक्षक व्हायचे असेल, तर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे आवश्यक असते.. राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेण्यात येते. आतापर्यंत राज्य परीक्षा परिषदेने सात वेळा टीईटी परीक्षा घेतली आहे. शिक्षक होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. त्यामुळे ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्यात यावी, तसेच त्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी होत होती..

Advertisement

विशेषत: मागील दोन-तीन वर्षांत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे.. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली.. या चौकशीतून राज्यातले तब्बल 7800 शिक्षक बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 उमेदवारांना पैसे घेऊन पास केल्याचे उघड झालंय.

Advertisement

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. तसेच 2018 मध्येही या परीक्षेत मोठ्या प्रमाणात अपात्र ठरलेल्या उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचे समोर आले आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून आलेला मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकालाची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. त्यात हा गैरप्रकार समोर आलाय.

Loading...
Advertisement

टीईटी परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी उमेदवारांकडून 50 ते 60 हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून आलेला मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर झालेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे… या बोगस शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्यही धोक्यात आले आहे..

Advertisement

आज देशभरात इतके कोरोनाचे रुग्ण सापडले.. जगभरातही कोरोनाचे थैमान सुरूच; जाणून घ्या, कोरोना अपडेट
एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटांकडे..! अनेक बदल केले जाणार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply