Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रातील थंडीची लाट कधी ओसणार..? हवामान खाते काय म्हणतंय..?

मुंबई : कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची तिव्र लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषत: विदर्भात हवामानात मोठी घट दिसेल. उत्तर-पश्चिम, मध्य भारत, पूर्व भारत आणि मध्य प्रदेशमधील काही भागात थंडीची लाट तीव्र राहणार आहे. शिवाय या काळात काही राज्यांमध्ये पावसाचाही अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे..

Advertisement

जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबादमध्ये 29 ते 31 जानेवारी दरम्यान हलका पाऊस व हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. दुसर्‍या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, पश्चिम हिमालयीन प्रदेशात मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. शिवाय 2 ते 4 फेब्रुवारीदरम्यान मैदानी भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.. पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, विदर्भ, बिहार आणि छत्तीसगडमध्ये येत्या दोन-तीन दिवसांत थंडीची लाट येऊ शकते. 28 ते 30 जानेवारीदरम्यान ओडिसा, मध्य प्रदेशातील निर्जन भागात तीव्र थंडीची लाट राहील. मध्य प्रदेशातील विविध भागात थंड वारे वाहतील.

Loading...
Advertisement

पुढील तीन दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. नंतर हळूहळू 2-3 अंश सेल्सिअसने वाढ होईल. पुढील दोन दिवसांत पूर्व भारतात किमान तापमान 2-4 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतावर 2 फेब्रुवारीपासून आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे..

Advertisement

सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही गडगडली.. गुंतवणूकदार धास्तावले..
कधी आणि का साजरा केला जातो राष्ट्रीय पर्यटन दिवस.. या वर्षाची काय आहे थीम

Advertisement
Advertisement

Leave a Reply