Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एलन मस्कच्या कंपनीला मोठा झटका..! सरकारच्या अटी मान्य केल्या तरच मिळेल एन्ट्री; पहा, काय आहे कंपनीच्या मागण्या

दिल्ली : आजमितीस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या एलन मस्कच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीस अजूनही भारताचे दरवाजे बंदच आहेत. भारतात प्रकल्प सुरू करण्यास कंपनी केव्हापासून तयार आहे. यासाठी कंपनीचे अधिकारी सुद्धा सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, केंद्र सरकारने कंपनीस आजिबात दाद दिलेली नाही. केंद्र सरकारने काही अटी ठेवल्या असून त्या अटींवर सरकार ठाम आहे.

Advertisement

टेस्ला भारतात आपल्या इलेक्ट्रिक कारची विक्री करण्यास उत्सुक आहे आणि जवळपास वर्षभरापासून दर कमी करण्यासाठी सरकारचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परंतु टेस्ला अधिकाऱ्यांनी केलेल्या युक्तिवादावर सरकार समाधानी नाही कारण कंपनीने अद्याप देशात गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही ठोस योजना सादर केलेली नाही.

Advertisement

अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला सांगितले आहे की, टेस्लाने भारतात यावे आणि आधी कार बनवावी. त्यानंतरच कोणत्याही सवलतींचा विचार केला जाईल. सूत्रांचे म्हणणे आहे, की टेस्लाला सूट देऊन संपूर्ण वाहन उद्योगास चुकीचा संदेश द्यायचा नाही कारण मारुती, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा यासारख्या अनेक देशांतर्गत कंपन्यांनी येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. टेस्ला देशात कार बनवण्याऐवजी येथे आयात केलेल्या कार विकू इच्छित आहे. आणि कंपनीचे हे धोरण सरकारला आजिबात मान्य नाही.

Advertisement

एलन मस्क यांना केंद्र सरकारने टेस्ला कारवरील आयात शुल्क कमी करावे असे वाटते, जेणेकरून ते परदेशात बनवलेल्या टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत सहज विकू शकतील. मात्र भारत सरकार यासाठी अजिबात तयार नाही. अलीकडेच केंद्र सरकारकडून मस्क यांच्या दबावाचा काहीही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले. सध्या, देशात 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या आयात केलेल्या कारवर 100% कर आकारणी होते, ज्यात विमा आणि शिपिंग खर्चाचा समावेश आहे आणि 30 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या कारवर 60 टक्के आयात कर आकारला जातो.

Loading...
Advertisement

ऑटो मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत स्पर्धा करणे सोपे नाही. येथे टाटा आणि महिंद्रा सारख्या देशांतर्गत कंपन्यांसह, मारुती, ह्युंदाई, एमजी, मर्सिडीज, ऑडी आणि जेएलआर सारख्या कंपन्या आधीच त्यांच्या उत्पादनांसह बाजारात आहेत. अशा स्थितीत एक किंवा दोन मॉडेल्सच्या आधारे भारतीय बाजारपेठ टेस्लासाठी खूप आव्हानात्मक आहे.

Advertisement

Mordor Intelligence च्या अहवालानुसार, भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजार 2026 पर्यंत 47 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अहवालात म्हटले आहे की, कोरोना संकट असूनही, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे येथील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ अपेक्षेपेक्षा वेगाने वाढत आहे.

Advertisement

वाव.. एलन मस्कच्या कंपनीला मिळणार जोरदार टक्कर; देशात ‘ही’ कंपनी देणार सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा

Advertisement

बाब्बो.. टेस्लाचा मालक इलॉन मस्क इतका अब्ज डॉलर टॅक्स भरून रचणार इतिहास

Advertisement
Advertisement

Leave a Reply