Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, तुमच्या नगरपंचायतीत कोण अध्यक्ष होणार, वाचा..!

मुंबई : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी आज मंत्रालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. त्यात 139 पैकी अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13, तर खुल्या प्रवर्गासाठी 109 नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

Advertisement

प्रवर्गनिहाय नगरपंचायतीचे आरक्षण

Advertisement

अनुसूचित जातीसाठी नगराध्यक्षपदाच्या 17 जागा असून, त्यातील 9 जागा अनुसूचित जाती (महिला), तर 8 जागा अनुसूचित जाती (सर्वसाधारण) साठी आरक्षित आहेत.

Advertisement

अनुसूचित जाती (महिला) राखीव- लाखणी, कुही, नातेपुते, खंडाळा (जि. सातारा), जळकोट (लातूर), माळेगाव बुद्रुक, पाटण, देहू, वैराग (सोलापूर).
अनुसूचित जाती (सर्वसाधारण) – म्हाळुंग श्रीपूर, भिसी, केज, देवणी, वाशी, औंढा नागनाथ, संग्रामपूर, लोणंद.

Advertisement

अनुसूचित जमाती प्रवर्गात अध्यक्षपदासाठी एकूण 13 जागा राखीव आहेत. त्यातील 7 अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी, तर 6 जागा अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) प्रवर्गासाठी आहेत.

Loading...
Advertisement

अनुसूचित जमाती (महिला) – धानोरा, अहेरी, मोहाडी, बाभुळगाव, साक्री, सोयगाव, शहापूर
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)– दिंडोरी, देवरी, गोंडपिंपरी, राळेगाव, भिवापूर, सडक अर्जुनी

Advertisement

खुल्या प्रवर्गासाठी एकूण 109 अध्यक्ष पदे असून, त्यातील 55 पदे हे महिलांसाठी राखीव असतील.
खुला प्रवर्ग (महिला) – कळंब, समुद्रपूर, अर्जुनी मोरगाव, अनगर, पारशिवनी, मंठा, शेंदुर्णी, हिंगणा, वाभवे वैभववाडी, खालापूर, बदनापूर, चामोर्शी, भातकुली, महादुला, वाडा, वडूज, रेणापूर, दापोली, शिंदखेडा, एटापल्ली, देवगड-जामसंडे, जामणी, कारंजा, महागाव, नायगाव, शिरुर अनंतपाळ, पालम, सिरोंचा, पोलादपूर, कोरपना, देवरुख, देवळा, सेनगाव, लांजा, सावली. फुलंब्री, कोरची, तिर्थपुरी, तळा, पोंभुर्णा, जाफ्राबाद, पाटोदा, जिवती, शिर्डी, कुडाळ, निफाड, धारणी, कर्जत, कुरखेडा, वडगाव मावळ, कोरेगाव, सेलू, आष्टी, सालेकसा, शिरुर-कासार,

Advertisement

खुला प्रवर्ग (सर्वसाधारण)- गुहागर, अकोले, मुक्ताईनगर, घनसावंगी, मानोरा, मंडणगड, माहूर, आष्टी (वर्धा), कवठे महांकाळ, लोहारा (बु), खानापूर, बार्शी-टाकळी, नांदगाव खंडेश्वर, मुरबाड, ढाणकी, कळवण, हातकणंगले, मुलचेरा, आजरा, दहिवडी, कणकवली, पेठ, पाली, बोदवड, तिवसा, मोताळा, मारेगाव, गोरेगाव, मंचर, मेढा, हिमायतनगर, मौदा, लाखांदूर, भामरागड, सिंदेवाही, मालेगाव-जहांगीर, वडवणी, सुरगाणा, अर्धापूर, चाकूर, धडगाव-वडफळ्या, पारनेर, नेवासा, तलासरी, मोखाडा, विक्रमगड, माणगाव, म्हसळा, कसई-दोडामार्ग, कडेगाव, शिराळा, माळशिरस, माढा, चंदगड.

Advertisement

दरम्यान, 2020मध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली. त्यानुसार आता नगरसेवकांमधूनच नगरपंचायतींचे नगराध्यक्ष निवडले जात असून, त्यांचा कालावधी अडीच वर्षे केला आहे. राज्यातील नगरपंचायतींमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे आधारे अध्यक्षांची पदे राखीव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

बेवड्यांसाठी आनंदाची बातमी.. वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..
बाब्बो.. आता चीन सगळ्या जगावरच ठेवणार ‘वॉच’; पहा, काय आहे चीनचा ‘तो’ नवा खतरनाक प्लान

Advertisement
Advertisement

Leave a Reply