Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बेवड्यांसाठी आनंदाची बातमी.. वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय..

मुंबई : तळीरामांसाठी महत्वाची बातमी आहे.. आता राज्यातील किराणा दुकाने, तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करता येणार आहे. ठाकरे सरकारने आज या निर्णयास मान्यता दिली. एक हजार स्क्वेअर फुट जागा असणाऱ्या सुपर मार्केटमध्ये एक स्टॉल टाकून वाईन विकता येणार आहे.. खरं तर हा 10 वर्षांपूर्वीचा प्रस्ताव होता. अखेर आज त्याला मंजूरी देण्यात आली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. तसेच या निर्णयाला विरोध करणाऱ्या भाजपवरही त्यांनी टीका केली.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की “महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन पॉलिसी ठरवली आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.. एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करता येणार आहे..”

Advertisement

तसेच छोटे शॉपस् सुरु करुन त्यांनाही वाईन विकण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते. शेतकऱ्यांच्या प्राॅडक्ट्सला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.. सुपर मार्केटमध्ये एक स्टॉल म्हणजे एक शोकेस निर्माण करण्यात येणार आहे. तसा निर्णय झाला आहे. गोवा व हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात वाइन विक्रीचे हेच धोरण स्वीकारलं गेलं आहे. इथे मात्र ते विरोध करीत असल्याचा टोला मलिक यांनी लगावला.

Loading...
Advertisement

सध्या राज्यात दरवर्षी 70 लाख लिटरची वाईनची विक्री होते. या नव्या धोरणामुळे हा आकडा 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारने वाईनवर प्रति लिटर 10 रुपयांचा अबकारी कर जाहीर केला आहे. त्यामुळे सरकारचेही उत्पन्न वाढणार आहे..

Advertisement

सरकार बेवड्यांना समर्पित
‘मस्त पियो, खूब जियो’ हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. कोरोनामध्ये सर्वसामान्यांना औषधीची आवश्‍यकता आहे, पण ‘दवा नहीं, हम दारू देंगे’, ‘महाराष्ट्र को मद्यराष्ट्र बनाएंगे’ हा या सरकारचा निर्णय आहे. कोरोनामध्ये कष्टकऱ्यांसाठी निर्णय घ्यायला यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेळ नाही. राजकारण करणे आणि दारूवाल्यांना प्रोत्साहन देणे, ही यांची भूमिका आहे, अशा शब्दांत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

Advertisement

Corona Update : कोरोनावर मात करण्यासाठी ‘त्या’ 5 गोष्टी महत्वाच्या; केंद्राने राज्यांना पाठवलेय पत्र
PSL2022 सूरु होण्याअगोदरच पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण

Advertisement
Advertisement

Leave a Reply