मुंबई – 27 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग 2022 (PSL 2022) च्या सुरुवातीलाच मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला (Shahid Afridi) कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यामुळे आता तो (PSL 2022) च्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे. आफ्रिदी या हंगामात क्वेटा ग्लॅडिएटर्सचा भाग आहे.
46 वर्षीय स्टार अष्टपैलू खेळाडूने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून स्वतःला संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की दुर्दैवाने माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे पण मला कोणतीही लक्षणे नाहीत.
आफ्रिदीने पुढे लिहिले की आशा आहे की लवकरच बरा होईल आणि शक्य तितक्या लवकर QG (क्वेटा ग्लॅडिएटर्स) मध्ये परत येणार. PSL 7 मधील सर्व संघांना शुभेच्छा, मी माझ्या शेवटच्या PSL आवृत्तीत माझे सर्व काही देण्यास वचनबद्ध आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार शाहिद आफ्रिदीला घरी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. पीएसएल संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर आणि आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आल्यानंतर त्याला क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या संघात पुन्हा सामील केले जाणार आहे.
पीएसएलच्या शेवटच्या मोसमात शाहिद मुलतान सुलतान्सचा भाग होता पण त्याला क्वेटा ग्लॅडिएटर्सने या मोसमासाठी विकत घेतले आहे. स्टार अष्टपैलू खेळाडूने पीएसएलमध्ये 50 सामने खेळले आहेत आणि सुलतान, पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज या 3 फ्रँचायझींसाठी 465 धावा केल्या आहेत. त्याने चेंडूसह देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आता पर्यंत त्याने 44 बळी घेतले आहेत.
शाहिद आफ्रिदीने सीझन सुरू होण्यापूर्वी सांगितले होते की पीएसएल 2022 हा त्याचा शेवटचा भाग असेल आणि त्याला त्याची पीएसएल कारकीर्द विजेतेपदासह संपवायची आहे.