Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. आता खुद्द मुख्यमंत्रीच करू शकणार नाहीत नव्या योजनांची घोषणा; पहा, कोणत्या राज्याने घेतलाय ‘हा’ निर्णय..?

दिल्ली राज्यात एखादी योजना सुरू करायची असेल, काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर या निर्णय आणि योजनांची घोषणा मुख्यमंत्री किंवा मंत्री करतात, असे आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र, देशात असे एक राज्य आहे जेथे आता मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून हा अधिकार काढून घेण्यात आला आहे. आसाम राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

आता खुद्द मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री नव्या योजना जाहीर करू शकत नाहीत. विशेष म्हणजे, राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर हे निर्बंध टाकले आहेत. आसाम मंत्रिमंडळाने हा अनोखा निर्णय घेतला आहे. गुरुवारी, आसाम सरकारने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह इतर सर्व मंत्र्यांवर बंदी घातली की ते कोणत्याही नवीन योजनेची घोषणा करू शकत नाहीत.

Advertisement

या निर्णयानुसार, कोणतीही नवीन योजना जाहीर करताना पूर्वपरवानगी घ्यावी लागणार असून त्यासाठी निधी उपलब्ध आहे की नाही, हेही लक्षात ठेवावे लागेल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कोणत्याही नवीन योजनेची घोषणा न करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

Loading...
Advertisement

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, अधिकृत भेटी आणि सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान मंत्री फक्त त्या योजनेची माहिती देतील जी बजेटचा भाग बनण्यास तयार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आर्थिक खबरदारी लक्षात घेता मुख्यमंत्री आणि मंत्री कोणत्याही नवीन योजनेची घोषणा करू शकत नाहीत. घोषणा करण्यापूर्वी त्यांना आर्थिक स्त्रोतांची काळजी घ्यावी लागेल.

Advertisement

सरकारी कार्यक्रमांमध्ये मंत्री किंवा अधिकाऱ्यांना भेटवस्तू देण्यासही आता बंदी घालण्याचा निर्णय आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने 10 मार्चपूर्वी नागरी निवडणुका घेण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाला केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Advertisement

‘या’ ठिकाणी पेट्रोल होणार 5 रुपयांनी स्वस्त; दारुच्या टॅक्समध्येही 25 टक्क्यांनी घट

Advertisement
Advertisement

Leave a Reply