आली रे आली.. आता चीनची बारी आली..! ‘WTO’ ने दिलाय चीनच्या बाजूने निकाल; अमेरिकेचे होणार मोठे नुकसान; जाणून घ्या, काय आहे प्रकरण..?
दिल्ली : जागतिक व्यापार संघटनेने (WTO) बुधवारी अमेरिका आणि चीनमध्ये अनुदानावरून सुरू असलेल्या वादावर निर्णय दिला. त्यात संघटनेने म्हटले आहे, की चीन दरवर्षी 64.5 कोटी किमतीच्या अमेरिकन वस्तूंच्या आयातीवर शुल्क लागू करू शकते. खरे तर, चीनने 2012 मध्ये WTO मध्ये अमेरिकेने 2008 ते 2012 दरम्यान लादलेल्या सबसिडी विरोधी शुल्काला आव्हान दिले होते. या प्रकरणाचा निकाल आता चीनच्या बाजूने लागला आहे. एक प्रकारे हा अमेरिकेसाठी अडचणीचा ठरणारा निकाल आहे.
अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम सोलर पॅनेलपासून स्टील वायरपर्यंतच्या 22 चिनी उत्पादनांवर झाला होता. अमेरिकेने असा युक्तिवाद केला होता, की डब्ल्यूटीओचे सोपे नियम चीनला केवळ उत्पादन वस्तूंवर सबसिडी देण्याचे स्वातंत्र्य देत नाहीत तर इतर देशांमध्ये साहित्य अत्यंत कमी किंमतीत विकण्याचीही परवानगी देतात. या सुनावणी दरम्यान जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची गरजही अमेरिकेने व्यक्त केली होती. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी डब्ल्यूटीओच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली.
चीनने सुरुवातीला तीन सदस्यीय WTO पॅनेलसमोर 2.4 अब्ज डॉलर किमतीच्या वस्तूंवर शुल्क टाकण्याचा अधिकार मागितला होता. अमेरिका आणि चीनमध्ये सतत तणाव आहे. चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तर अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. या दोन अर्थव्यवस्थांमध्ये दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. दोघांमध्ये व्यवसायाशी संबंधित अनेक मुद्दे आहेत, ज्यावर वाग सुरू आहे. चीन आपला माल इतर देशांना अत्यंत स्वस्त दरात विकतो, असाही आरोप अमेरिका चीनवर वारंवार करत आहे.
दरम्यान, आता चीनही अमेरिकेच्या वस्तूंवर आयात शुल्क लावू शकतो. याआधी अमेरिकेने आयात शुल्क टाकून चीनचे जे नुकसान केले होते तसेच नुकसान आता चीनही करणार आहे. त्यामुळे भविष्यात या दोन्ही देशांतील तणाव आधिक वाढण्याचीच शक्यता जास्त आहे.
बाब्बो.. आता चीन सगळ्या जगावरच ठेवणार ‘वॉच’; पहा, काय आहे चीनचा ‘तो’ नवा खतरनाक प्लान
आली रे आली.. आता चिनी स्मार्टफोनची बारी आली.., मोदी सरकारने घेतलाय हा मोठा निर्णय..!