मुंबई : मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही पाहायला मिळाली. गुंतवणुकदारांनी शेअर्स विक्रीचा सपाटा लावल्याचा परिणाम आजच्या बाजारावरही दिसला. गुरुवारी (ता. 27) सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्समध्ये तब्बल 1000 अंकांची घसरण झाली. दुसरीकडे निफ्टीने 330 अंकांनी कोसळला.. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना जवळपास तीन लाख कोटींचे नुकसान सोसावे लागले.
दरम्यान, याआधी सलग पाच दिवसाच्या घसरणीनंतर मंगळवारी (ता. 25) शेअर बाजार काही प्रमाणात सावरला होता. मंगळवारीही सुरुवातीच्या सत्रात 1000 अंकांची घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर बाजार सावरला आणि व्यवहार बंद होताना, सेन्सेक्स 366.64 अंकांनी वधारला होता. निफ्टीत 118.30 अंकांची वाढ झाली होती. त्यामुळे आज दुपारनंतर चित्र कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
सेन्सेक्समधील सर्वच्या सर्व ३० प्रमुख शेअरमध्ये घसरण झाली. त्यात डॉ. रेड्डी लॅब, एल. अँड टी., इन्फोसिस, नेस्ले, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, विप्रो या शेअरमध्ये २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. शिवाय आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा आदी महत्वाचे शेअरही घसरले.
निफ्टीतही सर्वच क्षेत्रीय निर्देशांकावर लाल निशाण फडकले. वोडाफोन, पेट्रोनेट एलएनजी, पॉवरग्रीड, बँक ऑफ बडोदा, येस बँक, टाटा पॉवर आदींचे शेअर घसरले. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने लवकरच व्याजदर वाढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जगभरातील भांडवली बाजारात मोठी घसरण होत असल्याचे सांगण्यात आले.
परदेशी गुंतवणुकदारांचा विक्रीचा सपाटा
शेअर बाजाराच्या प्री-ओपन सत्रापासूनच बाजारात घसरण होण्याचे संकेत मिळत होते. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 996.23 अंकांची घसरण होऊन निर्देशांक 57 हजारांखाली आला. निफ्टीत जवळपास 1.5 टक्क्यांची घसरण होऊन निर्देशांक 17 हजारांजवळ पोहचला. शेअर बाजारात आज दिवसभरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार हाेऊ शकतात. परदेशी गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्याने बाजारात घसरण झाल्याची चर्चा आहे. शेअर बाजारात विक्रीचा मोठा दबाव दिसून येत आहे.
सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही गडगडली.. गुंतवणूकदार धास्तावले..
बटाटे उकडतील झटपट… फक्त या सोप्या किचन टिप्सचे करा अनुसरण