Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही गडगडली.. गुंतवणूकदार धास्तावले..

मुंबई : भांडवली बाजारातील अनिश्चितता व अर्थसंकल्पातील संभाव्य करवाढीचे पडसाद कमॉडिटी बाजारात आज (ता. 27) पाहायला मिळाले. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात मोठी तेजी होती. मात्र, तेजीच्या वाटेवर घोडदौड करणाऱ्या सोने दरात आज मोठी घसरण झाली. आज (गुरुवारी) बाजार सुरु होताच सोने आणि चांदीमध्ये नफावसुली दिसून आली. सोन्याचा भाव 610 रुपयांनी, तर चांदीमध्ये 800 रुपयांची घसरण झाली. याआधी मंगळवारी सोन्याचा भाव 48697 रुपयांवर गेला होता. मागील महिनाभरातील तो सर्वाधिक दर होता.

Advertisement

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या सोन्याच्या भावात 613 रुपयांची घसरण होऊन 48355 रुपये प्रति तोळा झाला आहे. तसेच एक किलो चांदीचा भाव 63195 रुपये असून, त्यात 834 रुपयांची घसरण झाली. तत्पूर्वी, मंगळवारी सोने 244 रुपयांनी महागले होते. सोन्याचा भाव महिन्यातील उच्चांकी 48697 रुपयांवर गेला होता..

Advertisement

गुड रिटर्न्स (Goodreturns) वेबसाईटनुसार मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45900 रुपये, तर 24 कॅरेटचा भाव 49830 रुपये आहे. त्यात 150 रुपयांची वाढ झाली. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45900 रुपये आहे. दिल्लीत 24 कॅरेटचा सोन्याचा भाव 50100 रुपये आहे.

Loading...
Advertisement

बाजारात अनिश्चिततेचे वातावरण
भांडवली बाजारात सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय सोने आयात वाढत असल्याने केंद्र सरकारला वित्तीय तूट वाढीची चिंता सतावत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यात सोने आयात कमी करण्यासाठी करवाढ किंवा त्याबाबतची नियमावली आणखी कठोर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमॉडिटी गुंतवणूकदार धास्तावले आहेत.

Advertisement

बटाटे उकडतील झटपट… फक्त या सोप्या किचन टिप्सचे करा अनुसरण
काम की बात : मार्गदर्शनाशिवाय व्यायामाचे फायद्यांऐवजी होतात तोटे.. जाणून घ्या कसे

Advertisement
Advertisement

Leave a Reply