Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटांकडे..! अनेक बदल केले जाणार..

नवी दिल्ली : एअर इंडियाची मालकी आज (ता. 27) तब्बल 69 वर्षांनंतर पुन्हा एकदा टाटा समुहाकडे येणार आहे. भारत सरकारने सुमारे 69 वर्षांपूर्वी टाटा समुहाची ही विमान कंपनी विकत घेतली होती. परंतू, गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारने खासगीकरणावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर विविध सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले जात आहे. आता त्यात एअर इंडियाचाही नंबर लागला असून, पुन्हा एकदा ही कंपनी टाटा समूहाच्या मालकीची होणार आहे.

Advertisement

गेल्या वर्षी 8 ऑक्टोबर रोजी मोदी सरकारने एअर इंडियाला टेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील 100 टक्के हिस्सा विकण्यासाठी 12,906 कोटी रुपयांची बेसिक किंमत ठेवली होती. त्यात ‘स्पाइसजेट’चे प्रवर्तक अजय सिंग यांच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियमने 15,100 कोटी रुपयांची बोली लावली, तर त्यात टाटा ग्रुपने एअर इंडियासाठी 18,000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखवली.

Advertisement

त्यानुसार आता या कंपनीच्या विक्रीची सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाली असून, आज विमानसेवा टाटा समूहाकडे सोपवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 2003-04 नंतर केंद्र सरकारकडून करण्यात आलेले हे पहिले खासगीकरण आहे. त्याच वेळी एअर इंडिया हा टाटाचा तिसरा एअरलाइन ब्रँड असेल. कंपनीची याआधीच एअर आशिया इंडिया (AirAsia India) व विस्टारा (Vistara) मध्ये भागीदारी आहे.

Loading...
Advertisement

पायलट संघटनांचा विरोध
दरम्यान, इंडियन पायलट गिल्ड (IPG) आणि इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन (ICPA) या दोन एअरलाइन पायलट युनियनने एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापनाला कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय अन्य दोन युनियन्सनी विमान उड्डाणांच्या आधी विमानतळावरील वैमानिकांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजण्याच्या कंपनीच्या 20 जानेवारीच्या आदेशाला विरोध केला आहे. एअर इंडिया एम्प्लॉईज युनियन आणि ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशन यांनी दत्त यांना पत्र लिहून या आदेशाला विरोध केला आहे, असे म्हटले आहे की ते अमानवीय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमांचे उल्लंघन आहे.

Advertisement

बटाटे उकडतील झटपट… फक्त या सोप्या किचन टिप्सचे करा अनुसरण
Jio च्या प्लानने व्होडाफोन-आयडीया आणि एअरटेल हैराण; मिळतोय 90 GB डेटा आणि बरेच काही..

Advertisement
Advertisement

Leave a Reply