Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Election 2022 : समाजवादीने केली घोषणा.. अध्यक्ष अखिलेश यादव ‘या’ मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात

लखनऊ : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हेही यावेळी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढणार आहेत. मात्र, कोठून निवडणूक लढणार हे त्यांनी अद्याप जाहीर केलेले नव्हते. आता मात्र हा सस्पेन्स मिटला आहे. समाजवादी पार्टीने घोषणा केली आहे की पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव हे करहल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ सुद्धा गोरखपूरमधून निवडणुकीत आहेत.

Advertisement

त्यानंतर अखिलेश यादव यांनी सांगितले, की निवडणुका लक्षात घेऊन जनतेसाठी काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये 300 युनिट मोफत वीज, शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासाठी मोफत वीज दिली जाणार आहे. आमचे सरकार आल्यास आम्ही 22 लाख तरुणांना आयटी क्षेत्रात रोजगार देऊ. समाजवादी पार्टी घरोघरी प्रचारासाठी पूर्णपणे तयार आहे. टीव्हीवरील सर्वेक्षणात भाजप आघाडीवर असल्याच्या चर्चेवर ते म्हणाले की, सर्वेक्षणात ते पुढे आहेत, तर भाजपचे आमदार सतत का बाहेक पडत आहेत. त्यांच्या आमदारांचा विरोध का होत आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

Advertisement

सपा अध्यक्ष अखिलेश यादव हे सध्या आझमगड मतदारसंघाचे खासदार आहेत. 2012 मध्ये अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा ते विधान परिषदेचे सदस्यही झाले. योगी आदित्यनाथ 2017 मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा ते खासदार होते आणि नंतर विधान परिषदेचे सदस्य झाले. मात्र, यावेळी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

Loading...
Advertisement

उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांसाठी, 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांतील 55 जागांसाठी आणि तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारीला 59 जागांसाठी मतदान होणार आहे. 16 जिल्ह्यांतील जागांसाठी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारीला लखनऊसह 9 जिल्ह्यांतील 60 जागांवर मतदान होणार आहे. 5 व्या टप्प्यात 27 फेब्रुवारीला 11 जिल्ह्यांतील 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 10 जिल्ह्यांतील 57 जागांसाठी आणि सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 7 मार्चला 9 जिल्ह्यांतील 54 जागांसाठी मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

Advertisement

Election 2022 : आता सपा अध्यक्षही निवडणुकीच्या मैदानात; पक्ष लवकरच करणार मोठी घोषणा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply