Take a fresh look at your lifestyle.

Nagar Panchyat Election 2022 : नांदेडमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; भाजपला जबरदस्ते धक्के; पहा, काय आहे निकाल ?

मुंबई : राज्यातील 31 जिल्ह्यांतील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना जोरदार झटका बसला आहे तर अनेक दिग्गजांना मतदारसंघात वर्चस्व कायम राखण्यात यश मिळाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी वर्चस्व कायम राखले आहे.

Advertisement

नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंतायतींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नायगाव, अर्धापूर, माहूर नगरपंचायतींचा समावेश आहे. या तीनही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला निर्विवाद विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे, नायगाव नगरपंचायतीत काँग्रेसला तब्बल 17 पैकी 17 जागांवर विजय मिळाला आहे. नायगावमध्ये भाजप आमदार राजेश पवार यांची सत्ता आहे. त्यामुळे भाजप आमदार राजेश पवार यांना हा सर्वात मोठा झटका आहे.

Advertisement

नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने जिल्ह्यातील तीनही नगर पंचायतीत मुसंडी मारली आहे. काँग्रेसने नायगाव पाठोपाठ अर्धापूर नगरपंचायतीत 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवली आहे. तर माहूर नगरपंतायतीवरही काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. माहूर नगरपंतायतीत 17 पैकी 6 जागांवर यश मिळाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात आणि शिवसेनेला तीन जागांवर यश मिळाले आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. माहूर 1 आणि अर्धापूर नगरपंचायतीत 2 जागा मिळवून त्यांना नांदेड जिल्ह्यात फक्त 3 जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील 51 पैकी 33 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे.

Advertisement

गोव्यात काँग्रेस बरोबर आघाडी होणार का..? ; राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टच सांगितले; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply