Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

India Open 2022: अर्र.. कोरोना ने पुन्हा निर्माण केला अडथळा, आता…

मुंबई –  इंडिया ओपन बॅडमिंटन (India Open Badminton Championship) चॅम्पियनशिपमध्ये कोरोनाने (Corona) कहर सुरूच ठेवला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी, मिश्र दुहेरीच्या दोन खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. रशियाच्या रॉडियन अलिमोव्हला कोरोनाची लागण झाली असून त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याची जोडीदार अलिना ही देखील त्याच्या संपर्कात होती त्यामूळे तिनेही या स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. या दोन खेळाडूंना वगळल्यामुळे इंडोनेशियाची यंग काई आणि वेई हान ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली आहे.

Advertisement

कोरोनामुळे स्पर्धेतून बाहेर पडलेल्या खेळाडूंचे सामने पुन्हा होणार नसल्याचे स्पर्धेच्या आयोजकांनी आधीच स्पष्ट केले आहे. ज्या खेळाडूंविरुद्ध सामना होणार आहे त्यांना विजेता घोषित करण्यात येणार आहे आणि ते पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

Loading...
Advertisement

जागतिक बॅडमिंटन संघटनेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या ड्रॉमध्ये एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तिची मिश्र दुहेरी जोडीदारही जवळच्या संपर्कात होती आणि दोघांनीही स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आता थेट अंतिम सामन्यात खेळतील.

Advertisement

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा सुरू झाल्यापासून या स्पर्धेत कोविड-19 चे अनेक प्रकरणे समोर आली आहे. जागतिक बॅडमिंटन संघटनेने सांगितले होते की, कोरोना संसर्गामुळे सात खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यात किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, रितिका राहुल ठाकर, तारिसा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन अमन सिंग आणि खुशी गुप्ता यांचा समावेश होता. आता उपांत्य फेरी सुरू होण्यापूर्वी या स्पर्धेत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी साई प्रणीत आणि ध्रुव रावत देखील पॉझिटिव्ह आढळले होते. काही खेळाडूंना लागण झाल्याने इंग्लंड संघानेही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी माघार घेतली होती.

Advertisement
Advertisement

Leave a Reply