Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Big Bash League: जेव्हा पाकिस्तानचा गोलंदाज भिडतो ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला…

मुंबई – बिग बॅश लीग 2021-22 (Big bash league) च्या 50 व्या सामन्यात, सिडनी थंडर (Sydney thunder) आणि सिडनी सिक्सर्स (Sydney sixers) यांच्यातील सामन्यादरम्यान गोलंदाज आणि फलंदाज यांच्यात बाचाबाची झाली. ज्याचा व्हिडिओ बीबीएलने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.(Big Bash League: When Pakistan bowler clashes with Australian batsman …)

Advertisement

सिडनी सिक्सर्सच्या डावात मोइसेस हेन्रिक्स(Moises Henriques) फलंदाजी करत असताना विरोधी संघाचा गोलंदाज मोहम्मद हसनैनशी (Mohammad Hasnain) वाद झाला. सिक्सर्सच्या डावाच्या 12व्या षटकात मोहम्मद हसनैनने तिसरा चेंडू फुल लेन्थवर हेनलिक्सला टाकला, ज्यावर हेनलिक्सने हसनैनच्या दिशेने सरळ शॉट खेळला. यानंतर गोलंदाज हसनैनने चेंडू पकडला आणि हेनलिक्सकडे वेगाने फेकण्याचा इशारा केला आणि त्याचवेळी हेनलिक्सकडे पाहण्यास सुरुवात केली.

Loading...
Advertisement

जेव्हा हसनैनने हे केले तेव्हा हेन्रिक्सनेही प्रतिक्रिया दिली आणि हसनैनकडे पाहू लागला. मात्र, त्यानंतर हसनैन त्याच्या रणअपकडे वळला. यानंतर हसनैनने पुढचा चेंडू शॉर्ट टाकला, ज्यावर फलंदाजाला धक्का बसला आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. तसे, अंपायरने हा चेंडू वाईड घोषित केला आणि गोलंदाजाला बाउंसर बॉल असल्याचा इशाराही दिला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.( Big Bash League: When Pakistan bowler clashes with Australian batsman …)

Advertisement
Advertisement

Leave a Reply