Take a fresh look at your lifestyle.

आफ्रिकेनंतर ‘हे’ संघ देणार टीम इंडियाला आव्हान,जाणून घ्या संपूर्ण शेड्युल..

मुंबई – भारतीय क्रिकेट (Indian cricket team) संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका गमवल्यानंतर यावर्षी भारतीय संघाला पुन्हा एकदा मोठ्या आव्हानाला समोर जाणार आहे. यावर्षी भारतीय संघ कसोटी मालिका कमी तर एकदिवसीय मालिका जास्त खेळणार आहे.

कसोटी मालिका गमावलेल्या भारतीय संघासमोर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांचे आव्हान असणार आहे. त्यात नवीन वनडे कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते तर टी-20 विश्वचषकानंतर त्याने टी-20 कर्णधारपद सोडले होते.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यानंतर भारतीय संघ मायदेशात दोन मालिका खेळणार आहे. फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारतात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. विंडीजविरुद्धची मालिका संपल्यानंतर टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. लंकेचा संघ भारतात दोन कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.

वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसणार . त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. 9 ते 19 जून दरम्यान पाच टी-20 सामन्यांची मालिका आफ्रिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. एक कसोटी, तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. एक कसोटी सामना गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेचा भाग असेल. सध्या भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मागच्या वर्षी झालेल्या चार कसोटींनंतर पाचवी कसोटी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली होती.

Advertisement

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया सप्टेंबरमध्ये आशिया कप खेळू शकते. त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. टीम इंडिया ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply