Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ वादामुळेच भारतीय संघाने सामना गमावला; पहा, कुणी केलाय हा खुलासा..?

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने भारतीय संघाच्या पराभवाच्या कारणांचा खुलासा केला आहे. एल्गर म्हणाला की, डीआरएस वादामुळे भारता विरुद्धच्या महत्त्वपूर्ण तिसऱ्या कसोटीत लक्ष्य गाठण्यासाठी वेळ मिळाला. या वादामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे लक्ष वेधून घेतले. एल्गरला आऊट देण्याचा निर्णय थर्ड अंपायरने बदलला. यामुळे भारतीय संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि कर्णधार विराट कोहली, आर. अश्विन आणि उपकर्णधार के. एल. राहुल याने आफ्रिकी प्रसारण एजन्सी सुपर स्पोर्ट्सवर जोरदार टीका केली. त्यामुळे काही काळ वाद वाढला होता.

Advertisement

विजयासाठी 212 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने त्यावेळी एका विकेटच्या मोबदल्यात 60 रन केले होते. भारतीय संघ डीआरएस वादात अडकला आणि पुढच्या आठ ओव्हरमध्ये यजमानांनी 40 रन केले. डीन एल्गर म्हणाला, की यामुळे आम्हाला वेळ मिळाला आणि आम्ही जलद रन करू शकलो. यामुळे आम्हाला लक्ष्य गाठण्यात मदत झाली. तो म्हणाला, की त्याचा आम्हाला फायदा झाला. त्यावेळी भारतीय संघ सामना विसरून भावूक होता. कदाचित ते दडपणाखाली असतील आणि परिस्थिती त्यांच्या बाजूने नसेल या परिस्थितीची त्यांना सवय नाही.

Advertisement

घरच्या मालिकेतील पहिला सामना हरणे कधीही आदर्श नसते. दक्षिण आफ्रिकेत मात्र सावकाश सुरुवात करण्याचा ट्रेंड पडला आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर आम्ही जागे झालो आणि आमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी केली आणि उर्वरित सामने जिंकले. भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली, आर अश्विन आणि केएल राहुल डीआरएस वादात शिक्षेपासून वाचले आहेत. आयसीसीच्या सामना अधिकाऱ्यांनी भारतीय खेळाडूंचे वर्तन आचारसंहितेचा भंग करणारे करणारे मानले नाही.

Loading...
Advertisement

दरम्यान, आता या नंतर दोन्ही देशांदरम्यान एकदिवसीय क्रिकेट मालिका होणार आहे. या मालिकेत तीन सामने होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा नाही. विराट कोहली आहे मात्र तो आता कर्णधार नाही. तर या मालिकेसाठी के. एल. राहुल संघाच्या कर्णधारपदी राहणार आहे. याआधी दुसऱ्या कसोटीत राहुल हा कर्णधार होता. मात्र, या कसोटीतही भारतीय संघास विजय मिळवता आला नाही. त्यानंतर आता एकदिवसीय मालिकेत संघ काय कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

… म्हणून श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका आयपीएलसाठी एकदम तयार; जाणून घ्या, काय आहे महत्वाचे कारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply