Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Election 2022 : भाजपनेही केलीय पहिली यादी जाहीर.. पहा, मुख्यमंत्र्यांना कुठून मिळालेय तिकीट ?

दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने जवळपास 107 उमेदवारांची नावे या यादीत आहेत. या यादीत 21 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर 21 विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना अयोध्येतून तिकीट न देता गोरखपूर मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना अयोध्येतून तिकीट देण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र, मागील काही दिवसांपासून काही मंत्री आणि आमदारांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे भाजपने हा निर्णय बदलला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

या निवडणुकांसाठी काँग्रेसनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता भाजपनेही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. एकूण 107 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 57 जागेवरील उमेदवारांची आणि दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांपैकी 48 जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत 21 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. हे 21 उमेदवार पहिल्यांदाच विधानसभेची निवडणुकीत असतील. तर, 21 विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे.

Advertisement

दरम्यान, उत्तर प्रदेशात तीन कॅबिनेट मंत्री आणि सहा आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळेच भाजप निवडणूक यादी उशिराने आली आहे. 2017 ची पुनरावृत्ती घडवून आणण्याचा दबाव असतानाच मंत्री आणि आमदारांनी पक्ष सोडल्याने भाजप बॅकफूटवर आहे. त्यामुळे पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

Loading...
Advertisement

उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.

Advertisement

भाजपमधून या, तिकीट घ्या..! विरोधकांनी दिलाय स्पष्ट संदेश; पहा, काय सुरू आहे ‘त्या’ भाजप राज्यात

Advertisement
Advertisement

Leave a Reply