Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भाजपमधून या, तिकीट घ्या..! विरोधकांनी दिलाय स्पष्ट संदेश; पहा, काय सुरू आहे ‘त्या’ भाजप राज्यात

लखनऊ : सध्या उत्तर प्रदेशात फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. या राजकारणाचा सर्वाधिक फटका सत्ताधारी भाजपला बसत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारमधील मंत्री आणि आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. निवडणुकीआधी या राजीनामा सत्रामुळे भारतीय जनता पक्षाची राजकीय गणिते बिघडली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षांनीही भाजपमधून येणाऱ्यांना तिकीट देण्यास प्राधान्य दिले आहे.

Advertisement

सपा-आरएलडी युतीने आपल्या पहिल्या यादीद्वारे पक्षांतर करणाऱ्यांना संदेश दिला आहे. जर तुम्ही मजबूत असाल आणि चांगला जनाधार असेल तर तुम्ही तिकीट मिळवू शकता. या यादीत आतापर्यंत सहा दलबदलू नेत्यांना तिकीट मिळाले आहे. त्यापैकी दोन विद्यमान आमदार आहेत. आतापर्यंत केवळ 29 जागांची यादी जाहीर झाली आहे. शुक्रवारी आणखी यादी येईल. यावेळी भाजपमधून सपामध्ये लोक येण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक मंत्री आणि आमदार तिकीटासाठी सपाकडे येत आहेत. गुरुवारी पहिल्या यादीत या सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Advertisement

भाजपमधून आरएलडीमध्ये आलेले आमदार अवतार सिंह भडाना हे चार वेळा खासदार आहेत. हरियाणातही त्यांचा चांगला प्रभाव आहे. ते आता आरएलडीचे उमेदवार आहेत. काँग्रेस सोडून आरएलडीमध्ये दाखल झालेले गजराज सिंहही उमेदवार झाले आहेत. गजराज सिंह हापूरमधून चार वेळा निवडणूक जिंकले आहेत.

Loading...
Advertisement

भारतीय किसान युनियन पश्चिम उत्तर प्रदेशात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची राजकीय गणिते बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. धर्मेंद्र मलिक यांनी लखनऊमध्ये अखिलेश यादव यांची भेट घेतली. बीकेयू ही बिगर राजकीय संघटना असली तरी धर्मेंद्र मलिक आणि इतर काहींना पश्चिम उत्तर प्रदेशातून आरएलडी किंवा सपाकडून तिकीट मिळू शकते, असे मानले जात आहे.

Advertisement

अर्र.. भाजपला बसणार आणखी झटके..! आणखी मंत्री आणि आमदार देणार राजीनामा; पहा, कुणी केलाय ‘हा’ दावा

Advertisement
Advertisement

Leave a Reply