Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Election 2022 : पंजाबचा मुख्यमंत्री कोण ? ; फोन करा आणि नाव सांगा; ‘आम आदमी’ ची भन्नाट आयडीया

नवी दिल्ली : देशातील 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर येथील राजकारणाने वेग घेतला आहे. कोरोनामुळे यंदा प्रचार ऑफलाइन आहे. राजकीय पक्षांना जाहीर सभा, मेळावे, मोटारसायकल रॅली घेता येणार नाही. त्यामुळे या पक्षांनी ऑनलाइन प्रचारावर भर दिला आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससमोर आम आदमी पार्टीने मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यात आम आदमी पार्टी प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाबाबत राज्यातील नागरिकांनाच आवाहन केले आहे. त्यांच्या या राजकीय चालीने विरोधकांनाही आश्चर्यात टाकले आहे.

Advertisement

पंजाबमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला बहुमत मिळेल, असा कौल दिसून येतोय. अनेक सर्व्हेंमध्येही असे दिसून येत आहे. यामुळे पंजाबचा पुढील मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचाच असेल फक्त पक्षातील नेत्यांपैकी जनतेला कोणता मुख्यमंत्री हवाय, हे लोकांनीच सांगावे, असे आवाहन आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केले. यासाठी त्यांनी एक फोन नंबरही जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जनतेने आपल्या नेत्याचे नाव सांगावे. ज्या नेत्याच्या नावाने जास्त कौल येईल, तोच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावर 17 जानेवारीपर्यंत लोकांना आपले मत द्यायचे आहे.

Advertisement

अरविंद केजरीवाल म्हणाले की, सर्व सर्वेक्षणांमध्ये आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. काहींमध्ये 57 तर काहींच्या सर्वेक्षणात 58 जागा मिळतील असे सांगितले जात आहे. आपल्याला 60 नाही तर 80 जागांची गरज आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, या वर्षात देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. कोरोनाचे संकट असताना या निवडणुका होत असल्याने निवडणूक आयोगान विशेष खबरदारी घेतली आहे. उत्‍तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), उत्‍तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या राज्यांमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

Advertisement

उत्‍तर प्रदेशात 14 जानेवारीला अधिसूचना जारी होणार आहे. या राज्यात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 03 मार्च आणि 07 मार्च या टप्प्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल घोषित होणार आहेत. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये मात्र दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या राज्यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दोन टप्प्यात मतदान होईल. 15 जानेवारीपर्यंत कोणत्याही सभा, पदयात्रा, सायकल यात्रा घेता येणार नाहीत. याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले.

Advertisement

Election 2022 : ‘त्या’ राजकारणात विरोधकांनीही साधलीय बरोबरी; आघाडीवरील भाजपला दिले जोरदार धक्के

Advertisement
Advertisement

Leave a Reply