Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 ; राजीव शुक्ला यांनी दिला मोठा अपडेट, ऐकून फॅन्स होणार खुश

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI) चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) बद्दल मोठी अपडेट दिली आहे. यावेळी संपूर्ण आयपीएल स्पर्धा आम्ही भारतात घेण्याचे प्रयत्न करणार . तसेच संजीव गोएंका यांच्या RPSG ग्रुप चा लखनऊ संघ आणि CVC कॅपिटलच्या अहमदाबाद संघाला मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून औपचारिक मान्यता मिळाली. मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर औपचारिक होकार देण्यात आला आहे. तसेच मेगा लिलावापूर्वी या दोन्ही संघाला प्रत्येकी तीन तीन खेळाडू निवडण्यासाठी मुद्दत देण्यात आली असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

Advertisement

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले असून अहमदाबाद फ्रँचायझी ज्याची बोली CVC ने जिंकली होती. त्यांच्यावर भारताबाहेरील एका सट्टेबाजी कंपनीत त्याचे काही शेअर्स आहेत, असे आरोप उपस्थित केले गेले होते . बीसीसीआयने ताबडतोब या प्रकरणात अक्शन घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आणि सर्व गोष्टींचा विचार करून समितीने निर्णय घेतला आणि फ्रेंचायझीला औपचारिक मान्यता देण्यात आली. बीसीसीआयने पुन्हा अतिरिक्त सावधगिरी बाळगली आणि त्यांना (सीव्हीसी) आपण कोणत्याही (सट्टेबाजी) कंपनीमध्ये भाग घेणार नाही असे हमीपत्र देण्यास सांगितले,अशी देखील माहिती राजीव शुक्ला यांनी दिली.

Advertisement

तो पुढे म्हणाले विवोने आयपीएल मधून वेगळे होण्याचा निर्णय घेतला म्हणून टाटा दोन वर्षांसाठी आयपीएलचे प्रायोजक म्हणून आले आहेत. आयपीएल 2022 बद्दल विचारले असता, राजीव शुक्ला म्हणाले: आम्ही इंडियन प्रीमियर लीग भारतातच होईल याची खात्री करण्याचा प्रयत्न करू. आणि या प्रकरणी मार्चमध्ये कोविडची परिस्थिती कशी आहे हे पाहून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेबाबत ते म्हणाले की, अद्याप याबाबदल निर्णय झालेला नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply