Take a fresh look at your lifestyle.

मुंबई इंडियन्सने शोधला रोहित शर्माचा उत्तराधिकारी.. हा खेळाडू होणार कॅप्टन..!

मुंबई : ‘आयपीएल’मधील सर्वाधिक यशस्वी टीम म्हटलं की एकच नाव समोर येतं, ते म्हणजे ‘मुंबई इंडियन्स..’ या संघाने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल ट्राॅफीवर नाव कोरलंय. विशेष म्हणजे, टीमच्या या यशात रोहित शर्मा याचे नेतृत्व महत्वाचे ठरलेले आहे. मात्र, आता रोहित शर्मा 34 वर्षांचा झाला असून, अजून फार तर दोन ते तीन वर्षेच तो संघाचे नेतृत्व करु शकतो. त्यामुळे मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने आतापासून त्याचा उत्तराधिकारी शोधण्याचे काम सुरु केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार एका नावावरही शिक्कामोर्तबही करण्यात आल्याचे समजते.. हा खेळाडू मूळचा मुंबईकरच असल्यानेच त्याच्या नावाला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. हा खेळाडू म्हणजे, भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर..!

Advertisement

आयपीएल-2022 साठी फेब्रुवारी महिन्यात मेगा लिलाव (IPL Auction 2022) होणार आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये 8 संघांनी एकूण 27 खेळाडूंना रिटेन केलं असून, लखनऊ व अहमदाबाद या दोन नव्या टीम लिलावाआधी प्रत्येकी 3 खेळाडूंना थेट विकत घेणार आहेत. आयपीएलच्या सगळ्या टीम लिलावाची तयारी करत असतानाच, श्रेयस अय्यर याच्याबाबत (Shreyas Iyer) महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ‘आयपीएल-2020’मध्ये श्रेयसने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीची टीम फायनलपर्यंत पोहोचली होती, पण अंतिम सामन्यात मुंबईने त्यांना धूळ चारली. नंतर आयपीएल-2021मध्ये श्रेयसला दुखापत झाली नि दिल्लीने ऋषभ पंतच्या खांद्यावर कर्णधार पदाची जबाबदारी दिली.

Advertisement

श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरल्यानंतरही दिल्लीने पंतलाच कर्णधार म्हणून कायम ठेवले होते. आता पंत हाच कर्णधार राहणार असल्याचे लक्षात आल्यावर श्रेयसने दिल्लीला बाय बाय केले. सध्या श्रेयसला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी दोन संघांमध्ये जोरदार चुरस लागली आहे. केकेआर (KKR) संघही श्रेयसला कर्णधार करण्यासाठी इच्छुक आहे. कलकत्याने इयान मॉर्गनला रिटेन केलेले नाही, त्यामुळे ते श्रेयसकडे कर्णधार म्हणून पाहत आहेत. दुसरीकडे मुंबई इंडियन्सही (Mumbai Indians) श्रेयसला टीममध्ये घेण्यासाठी आग्रही आहे. रोहितचा उत्तराधिकारी म्हणून श्रेयसला तयार करण्यासाठी मुंबई संघ इच्छुक आहे.

Advertisement

वाॅर्नर कुठे जाणार..?
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडा व ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिस यांच्यासोबत लखनऊची टीम चर्चा करीत आहे. मेगा लिलावाआधीच लखनऊ टीम डेव्हिड वॉर्नरलाही घेऊ शकते. गेल्या वेळी खराब फाॅर्ममध्ये असल्याने हैदराबादने वाॅर्नरला प्रथम कॅप्टन्सी व नंतर टीममधूनही डच्चू दिला होता. नंतर वाॅर्नरला रिटेनही करण्यात आले नाही. मात्र, नंतर झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने धमाकेदार कामगिरी केली.

Advertisement

लखनऊ टीम के.एल. राहुल याला कर्णधार करण्यासाठी इच्छूक असल्याचे समजते. मागील मोसमात तो पंजाब किंग्सकडून खेळला होता, तर हार्दिक पांड्या अहमदाबादचा कर्णधार होणार असल्याची चर्चा आहे..

Advertisement

दरमहा फक्त 1000 रुपये गुंतवा.. मिळवा 2 कोटींहून अधिक रक्कम.. कसे वाचा सविस्तर
Election 2022 : लागा तयारीला.. आणि मग महापालिका-झेडपीच्या निवडणुकीसाठी होणार मोकळे आकाश..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply