Take a fresh look at your lifestyle.

गुरुजींचे पगार लटकले..! टीईटी गैरव्यवहारातील तुकाराम सुपे ठरलेत कारणीभूत..

मुंबई : राज्यातील अनेक विभागातील शिक्षकांचे पगार रखडले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) केलेल्या गैरव्यवहारामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त आणि पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम सुपे हे त्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने शिक्षकांच्या पगारासाठी आता थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना साकडे घातले आहे.

Advertisement

टीईटी गैरव्यवहारात तुकाराम सुपे यांचे नाव आल्याने पोलिसांनी त्यांचे कार्यालय सील केले आहे. मात्र, राज्यातील शिक्षकांची कागदपत्रे शालार्थ मान्यतेसाठी सुपे यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आली होती. मात्र, आता त्यांचे कार्यालय ‘सील’ केलेले असल्याने शिक्षकांचे वेतन रखडले आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या सर्व शिक्षकांना मान्यता दिली आहे. केवळ पडताळणी करून शालार्थ आयडी देण्यासाठी ही सर्व कागदपत्रे सुपे यांच्याकडे सादर करण्यात आली होती.

Advertisement

शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कागदपत्रे तपासून मान्यता दिल्यानंतर त्यांची पुर्नपडताळणी करण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे पाठवले जातात. त्यामुळे सुपे यांच्या कार्यालयाला लावलेले ‘सील’ काढावे, तसेच शालार्थ आयडी मान्यता आणि संदर्भातील कागदपत्रे, फायली निकालात काढाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Advertisement

गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हे शिक्षक सेवेत असून, शिक्षण उपसंचालक कार्यालयानेही त्यांना मान्यता दिली आहे. केवळ शालार्थ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी किती महिने वाट बघायची, असा सवाल राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे समन्वयक व मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा. मुकुंद आंधळकर यांनी केला आहे..

Advertisement

भारतातील कोणत्या राज्यात कशी साजरी होते मकर संक्रांती.. जाणून घ्या कुठे आहे कोणती परंपरा
कारवाल्यांसाठी महत्वाची बातमी : कार विमा हप्ता ‘असा’ होईल कमी; जाणून घ्या, काही सोप्या टिप्स

Advertisement
Advertisement

Leave a Reply