Take a fresh look at your lifestyle.

अमृता फडणवीस व विद्या चव्हाण यांच्यात कलगीतुरा रंगला.. कशावरुन पेटलाय वाद वाचा..?

मुंबई : सध्या राजकारणाची पातळी किती खालावली आहे, हे गेल्या काही दिवसांतील घटनांवरुन समोर येते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत भाजप नेत्याने आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यानंतर सुरु झालेला वाद क्षमताना दिसत नाही.

Advertisement

रश्मी ठाकरे (rashmi thackery) यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट प्रकरणावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadanvis) व राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण (vidya chavan)  यांच्यात आता कलगीतुरा रंगला आहे. मात्र, त्यांच्यातील हा वाद थेट कोर्टात पोहोचला असून, अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय.

Advertisement

नेमकं काय झालं..?
भाजप नेत्याच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी संताप व्यक्त केला होता. त्या म्हणाल्या, की ‘रश्मी ठाकरे यांना राबडी देवी यांची उपमा दिली, हे बरं झालं. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीला उपमा दिली असती, तर ‘डान्सिंग डॉल’ अशी प्रतिमा झाली असती. रश्मी ठाकरे यांची प्रतिमा वाईट नाही, हे मला भाजपवाल्यांना सांगावसं वाटतं. दुसऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोबाबत बोलताना, तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय गुण उधळले, त्याबाबत ट्विट केलं, तर बरे होईल…!”

Advertisement

अमृता फडणवीस संतापल्या..
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी ‘डान्सिंग डॉल’ असा उल्लेख केल्याने अमृता फडणवीस कमालीच्या संतापल्या. मग त्यांनीही विद्या चव्हाण यांच्या घरातील कलह बाहेर काढत थेट ऐकरी भाषेतच चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला.

Advertisement

”आपल्या सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण.., आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण..! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला.. मगच मिळेल तुला निर्वाण..!” अशा काव्यमय भाषेत फडणवीस यांनी चव्हाण यांना इशारा दिला आहे.

Advertisement

अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना कायदेशीर नोटीस बजावली असून, त्यावर कोर्टातच खुलासा करावा, असे नोटीसीमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे..

Advertisement

फक्त 9 महिन्यांत रेल्वेने वसूल केलेत 144 कोटी; पहा, रेल्वेने काय केलीय कारवाई ?
आज सोने आणि चांदीचे दरात पुन्हा घट; जाणून घ्या, देशातील सोने मार्केटमध्ये काय आहे परिस्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply