Take a fresh look at your lifestyle.

कोणत्या शहरातील नागरिक मास्कबाबत आहेत गंभीर.. मुंबई, पुण्यात काय स्थिती?

मुंबई : 11 प्रमुख शहरांमध्ये केलेल्या अभ्यासात राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली, रायपूर आणि चंदीगड ही मास्क घालण्याच्या बाबतीत सर्वात वाईट कामगिरी करणारी शहरे म्हणून समोर आली आहेत. कोविड-19 साठी आवश्यक असलेल्या मास्क प्रोटोकॉलचे किती लोक पालन करत आहेत हे शोधण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.

Advertisement

सर्वात कमी टक्केवारी (28.13 टक्के) छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये मास्क परिधान करताना आढळली. पुणे, चंदीगड आणि नवी दिल्ली यांनी अनुक्रमे 33.60 टक्के, 36.30 टक्के आणि 38.25 टक्के या आकडेवारीचे थोडे चांगले पालन केले.

Advertisement

11 शहरांमधील सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या वयोगटातील निरीक्षणांवर आधारित नॉन-प्रॉफिट थिंक टँक डिजिटल इंडिया फाउंडेशन (DIF) द्वारे हा अभ्यास केला गेला. यासंबंधीचा डेटा 23 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 2021 दरम्यान गोळा करण्यात आला आणि त्यात समाविष्ट असलेल्या नमुन्यांची (सहभागी) एकूण संख्या म्हणजेच नमुन्याचा आकार 10,841 होता.

Advertisement

मास्क संबंधित नियमांचे 76.28 टक्के पालन करणारे मुंबई हे सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे शहर असल्याचे आढळून आले. त्यापाठोपाठ हैदराबाद आणि शिमला यांचा क्रमांक लागतो. परंतु त्यांची अनुपालन पातळी अनुक्रमे 45.75 टक्के आणि 40.59 टक्के इतकी खराब राहिली. जम्मू (39.40 टक्के अनुपालन), कोलकाता (40.55 टक्के), चेन्नई (38.90 टक्के) आणि गुवाहाटी (38.83 टक्के) ही इतर शहरे या अभ्यासांतर्गत समाविष्ट आहेत.

Advertisement

या अभ्यासानुसार, 36 टक्क्यांहून अधिक मास्क नसलेल्या सहभागींनी कोविड-19 हा मोठा धोका नसल्याचा युक्तिवाद केला, तर आणखी 26 टक्के लोकांनी मास्कमुळे चिडचिड किंवा गुदमरल्यासारखे वाटले.

Advertisement

कापडी मास्कला अधिक पसंती दिले जात आहे. दिल्लीत ४५.५९ टक्के लोकांनी मास्क घातलेले नव्हते. उर्वरित पूर्ण किंवा अर्धवट झाकलेल्या चेहऱ्यापैकी, किमान ६५ टक्के लोकांनी N95 आणि सर्जिकल मास्क सारख्या इतर प्रकारा ऐवजी कापडी मास्कला प्राधान्य दिले.

Advertisement

कोविड संसर्ग रोखण्यासाठी कापडी मास्क कुचकामी ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. N95 मास्क त्याच्या प्रतिबंधात अधिक चांगले सिद्ध होत आहेत. दिल्लीत, महिला लोकसंख्या पुरुषांपेक्षा मास्क घालण्याच्या नियमाचे पालन करण्यात अधिक चांगली असल्याचे दिसून आले. येथे 31.52 टक्के पुरुषांच्या तुलनेत 47.34 टक्के महिलांनी मास्क घातले होते.

Advertisement

इतर प्रकारच्या मास्कच्या तुलनेत कापडी मास्कला प्राधान्य देण्याच्या बाबतीतही मुंबई दिल्लीसारखी दिसत होती. या शहरातील महिलाही त्यांच्या  पुरुषांपेक्षा मास्क घालण्यास सक्षम होत्या.

Advertisement
Advertisement

Leave a Reply