Take a fresh look at your lifestyle.

देशातील कारमध्ये आता ही गोष्ट असेल अनिवार्य.. मोदी सरकारचा मोठा निर्णय..

नवी दिल्ली : भारतात रस्ते अपघाताचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यात बळी जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.. बेदरकारपणे गाडी चालवणं, खराब रस्ते, सर्रास पायदळी तुडवले जाणारे वाहतूक नियम, यामुळे देशात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून येते.. विशेष म्हणजे, रस्ते अपघात रोखण्यासाठी दरवर्षी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात, मात्र त्यानंतरही अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही.

Advertisement

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होत नसल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Niting Gadkari) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या निश्चित कमी होईल, असा विश्वास मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला आहे..

Advertisement

काय निर्णय घेतलाय..?
रस्त्यावरील प्रवास सुरक्षित करण्यासाठी मोदी सरकार सर्व वाहनांमध्ये 6 एअरबॅग्स बसविण्याचा निर्णय घेतला असून, तो अनिवार्य केला जाण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय लोकांकडून लहान कार खरेदी केल्या जातात. मात्र, त्यात साधारण दोन एअरबॅग्स असतात. ऑटोमेकर्स फक्त मोठ्या आणि महागड्या कारमध्येच 6 एअरबॅग देतात. मात्र, लहान व स्वस्त कारमध्येही 6 एअरबॅग्स देण्याचे आवाहन त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार उत्पादक कंपन्यांना केले होते.

Advertisement

भारतीय ग्राहकांची सर्वाधिक पसंती ही त्यांच्या बजेटमध्ये असणाऱ्या कारला असते. या कारमध्ये 6 एअरबॅग दिल्यास अपघातात बळी जाणाऱ्यांचे प्रमाण बरेच कमी होईल, असे सांगण्यात येते. अर्थात, कारमध्ये एअरबॅग्जची संख्या वाढवल्यास कारच्या किमती नक्कीच वाढणार आहेत. कारमध्ये 6 एअरबॅग्ज दिल्यास किमतीत 8 ते 9 हजार रुपयांचा फरक पडणार असल्याचे सांगण्यात आले…

Advertisement

नव्या वर्षात जोरदार झटका.. ‘या’ कंपनीच्या मोटारसायकल ठरणार जास्त पैशांच्या; पहा, किती केलीय दरवाढ
बाब्बो… देशभरात गेल्या 24 तासात कोरोना रुग्ण वाढीचा उच्चांक

Advertisement
Advertisement

Leave a Reply