मुंबई : राज्यात वाहनांची संख्या वाढतेय, तसे अपघातही वाढताहेत.. त्यातून बळी जाणाऱ्यांची संख्याही वाढतेय.. वाहनांमुळे जग जवळ आले, तरी वाहतुक शिस्त बिघडल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळते.. अर्थात त्या दृष्टीने गेले वर्ष आधीच्या काही वर्षांपेक्षा त्यातल्या त्यात जरे बरे गेल्याचे म्हणावे लागेल.. कारण, गेल्या वर्षी राज्यात अपघाताचे प्रमाण काहीसे घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे..
महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर-2020 मध्ये 2663 अपघात झाले होते. त्यात 1180 जणांना आपला जीव गमवावा लागला.. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये अपघातात तीन टक्के घट झालीय.. मात्र, मृत्यूमध्ये 5 टक्के वाढ झाली. 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये जखमींची संख्या 122 ने घटली, तर 55 मृत्यू वाढल्याचे दिसत आहे.
जळगाव
जळगाव जिल्ह्यात 2019 च्या तुलनेत 2021 मध्ये 100 टक्के घट झालीय. 2019 मध्ये 59 अपघातांमध्ये 39 मृत्यू, तर 41 जखमी झाले होते. 2021 मध्ये जळगावात एकाही अपघाताची नोंद झालेली नाही.
नागपूर
नागपूर जिल्ह्यात 2019 च्या तुलनेत 88 टक्के वाढ झालीय. 2019 मध्ये 65 अपघातांमध्ये 36 मृत्यू, तर 77 जखमी झाले होते. 2021 मध्ये 122 अपघात झाले असून, त्यात 44 जणांचा मृत्यू झाला. तसेच 129 जण जखमी झाले.
मुंबई
मुंबई शहरात 2019 च्या तुलनेत 75 टक्के घट झालीय. 2019 मध्ये 259 अपघातांत 55 मृत्यू, तर 253 जखमी झाले होते. 2021 मध्ये 184 अपघातात 31 जणांनी जीव गमावला, 175 जण जखमी झाले.
2019 च्या तुलनेत पाहायला गेल्यास 2021 मध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, 2019 मध्ये कोरोनामुळे बराच काळ लाॅकडाऊन करण्यात आले होते. तर 2021 मध्ये राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाली होती. असे असतानाही अपघाताचे प्रमाण कमी झाल्याने एक दिलासादायक चित्र समोर येत आहे..
2022 मध्ये 94 दिवस आहेत विवाह मुहूर्त.. त्या कोणत्या आहेत तारखा जाणून घ्या
कारवाल्यांसाठी महत्वाची बातमी..! आता कार होणार आधिक सुरक्षित; केंद्र सरकार ‘तो’ निर्णय घेण्याच्या विचारात