Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो… देशभरात गेल्या 24 तासात कोरोना रुग्ण वाढीचा उच्चांक

 

Advertisement

मुंबई : देशातील कोरोनाचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 लाख 17 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही महिन्यातील हा उच्चांक आहे.  म्हणजेच 10 दिवसांत रुग्णांची संख्या 20 पटीने वाढली. यापूर्वी 28 डिसेंबर रोजी केवळ सहा हजार प्रकरणे नोंदवली गेली होती. त्याच वेळी, मुंबई आणि दिल्लीनंतर आता यूपीमध्येही संसर्गाचा वेग वाढला आहे.

Advertisement

गेल्या 24 तासांत येथे 2000 हून अधिक रुग्ण आले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वळसे पाटील यांच्या चार कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. महाराष्ट्रात गेल्या ४ दिवसांत राज्यातील विविध रुग्णालयातील ३३८ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे 20,181 नवीन रुग्ण आढळले आहेत. या महानगरात ३३.०६ टक्के दराने प्रकरणे वाढत आहेत.

Advertisement

एकट्या महाराष्ट्रात चोवीस तासात छत्तीस हजाराहून अधिक कोरोना बाधित आढळले आहेत. मिझोराममध्ये कोरोना विषाणूचे 579 नवीन रुग्ण आढळून आले असून कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.राजस्थानमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,656 नवीन रुग्ण आढळले आहेत.

Loading...
Advertisement

अधिकृत आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये गेल्या 24 तासांत 2,656 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1,438 रुग्णांची राज्याची राजधानी जयपूरमध्ये नोंद झाली आहे. त्याचवेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही कोरोनाच्या विळख्यात आले. अलीकडेच त्यांचा मुलगा वैभव गेहलोत यालाही कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली.

Advertisement

देशातील कोरोनाचा वेग थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे सुमारे 1 लाख 17 हजार रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी 28 डिसेंबर रोजी केवळ सहा हजार प्रकरणे नोंदवली गेली होती. त्याच वेळी, मुंबई आणि दिल्लीनंतर आता यूपीमध्येही संसर्गाचा वेग वाढला आहे. गेल्या 24 तासांत येथे 2000 हून अधिक रुग्ण आले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply