मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, त्यात ओमायक्राॅनने कहर केला आहे. राज्यात बुधवारी (ता. 5) दिवसभरात तब्बल २६ हजार ५३८ कोरोनाबाधित आढळून आले.. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता ८७ हजार ५०५ इतका झालाय. ओमायक्रॉन बाधित रुग्णांचा आकडाही तब्बल ७९७ वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, लोकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केलं जातंय. मात्र, मुंबई पोलिसांना २४ तास कर्तव्यावर हजर राहावं लागतं. त्यामुळे त्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. एकट्या मुंबईतच गेल्या २४ तासांत ७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेय. त्यामुळे राज्याचा गृह विभागाने पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे आता 55 वर्षांवरील पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, की “राज्यातील 55 वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश दिला आहे. त्यांनी कर्तव्यावर न येता, घरुन काम करायचं आहे. तसेच पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ९५१० पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, पैकी १२३ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
मुंबईसह राज्यातील पोलिस दलालाही कोरोनाने विळखा घातला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पोलिस स्टेशनमध्ये आता पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. तसेच 55 वर्षांवरील पोलिसांना घरुनच काम करण्याचा आदेश देण्यात आल्याने सरकारच्या या निर्णयाबाबत पोलिस कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे..
बापरे.. आता युरोपियन देशांना मिळालाय धोक्याचा इशारा; ‘त्यासाठी’ चीनच ठरतोय जबाबदार..
कारवाल्यांसाठी महत्वाची बातमी..! आता कार होणार आधिक सुरक्षित; केंद्र सरकार ‘तो’ निर्णय घेण्याच्या विचारात