Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टर दुर्घटनेमागील कारण आले समोर.. कोणाला धरलंय जबाबदार वाचा..?

नवी दिल्ली : कर्नाटकमधील कुन्नूरजवळ 8 डिसेंबर रोजी हवाई दलाचे हेलिकाॅप्टर कोसळून झालेल्या अपघातात भारताचे पहिले संरक्षणदल प्रमुख बिपीन रावत, लष्करी अधिकाऱ्यांसह 13 जणांचा मृत्यू झाला होता. सुलूर एअरबेसवरून वेलिंग्टनला जाताना ही घटना घडली होती. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असणारे हेलिकाॅप्टर कसे कोसळले, याबाबत अनेक शंका-कुशंका घेतल्या जात होत्या.. आता या दुर्घनटेमागील कारण समोर आले आहे.

Advertisement

रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेबाबत महत्वाची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, सीडीएस बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱ्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमध्ये कोणतीही तांत्रिक चूक नव्हती. तसेच यामध्ये कोणत्याही कटाचाही संबंध नसल्याचे समोर आलेय. खराब हवामानामुळे ‘नियंत्रित फ्लाइट इन टू टेरेन (CFIT) स्थिती’ हे या घटनेचे मुख्य कारण मानले जात आहे. ‘सीएफआयटी’ म्हणजे अपघाताच्या वेळी विमान नियंत्रणात असते, परंतु खराब हवामानामुळे किंवा पायलटच्या चुकांमुळे विमान जमिनीवर, पाणी किंवा इतर अडथळ्यांशी आदळते. अशा घटना सहसा खराब हवामान किंवा विमान लँडिंग करताना घडतात.

Advertisement

एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांनी अपघाताच्या त्रि-सेवेच्या तपासाचे नेतृत्व केले. त्यांनी बुधवारी (ता. 5) केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना तपासातील निष्कर्षांची माहिती दिली. रशियन बनावटीच्या दोन-इंजिनयुक्त Mi-17V5 हेलिकॉप्टरच्या अपघातामागे कोणतीही तांत्रिक चूक किंवा कट असण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे.

Loading...
Advertisement

तपास पथकाने संभाव्य मानवी चुकांसह अपघाताच्या सर्व संभाव्य परिस्थितींचा अभ्यास केला. हे कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे तर झालेले नाही ना, हेदेखील तपासले गेले. दरम्यान, या तपास अहवालाबाबत भारतीय हवाई दल किंवा संरक्षण मंत्रालयाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement

शिवभोजन केंद्रांवरील गैरकारभाराला आळा बसणार, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय..!
दिलासादायक..! कोरोनाचा खेळ खल्लास.. जबरदस्त औषध भारतात दाखल..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply