Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

आजची रेसिपी : हिवाळ्यात घरी तयार करा स्पेशल गुळाचा पराठा; जाणून घ्या, काय आहे रेसिपी

अहमदनगर : गुळाचा पराठा हा एक अद्वितीय आणि स्वादिष्ट उत्तर भारतीय खाद्य पदार्थ आहे. गुळ तसाही आरोग्यदायी आहे. गुळाचे अनेक फायदे आहेत. पराठे अनेक प्रकारचे आहेत. मेथी पराठा, पालक पराठा, पनीर पराठा, मुळा पराठा असे प्रकार आपण नेहमीच ऐकले असतील. मात्र, यातही काहीतरी नवीन करायचे असेल तर हा गुळाचा पराठा तयार करुन पाहता येईल. गुळाचा पराठा स्वादिष्ट तर आहेच शिवाय तयार करण्यासही अगदी सोपा आहे. चला तर मग, जाणून घेऊ या हा स्पेशल पराठा कसा तयार करतात ते.

Advertisement

गुळाच्या पराठ्यासाठी साहित्य
गव्हाचे पीठ 2 कप, बदाम 25, हिरवी वेलची 4, किसलेला गूळ 3 चमचे, तूप 3 चमचे, मीठ अर्धा चमचा,

Advertisement

रेसिपी
एका मोठ्या भांड्यात पीठ काढून घ्या. पिठात मीठ आणि 1 चमचा तूप टाका. कोमट पाण्याच्या मदतीने पीठ तयार करुन घ्या. पीठ 20 मिनिटे बाजूला ठेवा, जेणेकरून पीठ व्यवस्थित होईल. त्यानंतर गुळामध्ये बदाम पावडर आणि वेलची पूड घालून चांगले मिसळा.

Loading...
Advertisement

कोरडे पीठ टाकून थोडेसे लाटून घ्या. लाटलेल्या पराठ्यांवर थोडे तूप लावा. आता पराठ्यावर एक किंवा दोन चमचे सारण ठेवा. पीठ सपाट करा म्हणजे सारण एकसारखे होईल. पुन्हा कोरडे पीठ लावून पराठे लाटून घ्या. तवा गरम झाल्यावर पराठा तव्यावर टाका. हलका तपकिरी रंगाचा झाला की कडेवरून उलटा. दुसऱ्या बाजूलाही तपकिरी रंग आल्यानंतर वरच्या बाजूला थोडे तूप लावा. चारी बाजूने तूप पसरवा, दुसऱ्या बाजूलाही तूप लावा आणि दुसऱ्या बाजूलाही थोडे तूप पसरुन घ्या. पराठा दोन्ही बाजूंनी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. सर्व पराठे अशाच प्रकारे तयार करा. स्वादिष्ट गुळाचा पराठा तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.

Advertisement

आजची रेसिपी : नाश्त्याला बनवा आरोग्यदायी मुळा पराठा.. सोपी आहे रेसिपी

Advertisement
Advertisement

Leave a Reply