महाराष्ट्रात कोरोना-ओमिक्राॅनचा धोका वाढतोय, दहावी-बारावीच्या परीक्षांचे काय होणार..?
मुंबई : महाराष्ट्रात मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मुंबईसह अनेक शहरातील शाळांना पुन्हा एकदा टाळे ठोकण्यात आले असून, ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. मात्र, दहावी-बारावीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीनेच सुरु आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा उचल खाल्ल्याचे दिसत आहे. जोडीला ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्याही रोज नवा विक्रम करीत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेनुसार, राज्यात मंगळवारी (ता. 4) तब्बल 18466 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर 4558 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रात ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 653 वर पोहोचलीय.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, मार्च-एप्रिलमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा होणार आहेत. (SSC HSC Exam). कोरोना रुग्ण वाढल्यास यंदा तरी या परीक्षा होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, की सध्या तरी दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचे निश्चित केलेले असून, अजून कोणताही वेगळा निर्णय घेतलेला नाही.
मोदी सरकारच्या निर्णयानुसार, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 3 जानेवारीपासून लसीकरण सुरु झाले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण लसीकरण जानेवारीअखेर पूर्ण करण्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे टार्गेट आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणार असून, आरोग्य व शिक्षण विभागाच्या संपर्कात असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले..
दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु असताना, एखाद्या विद्यार्थ्याच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा खुद्द विद्यार्थ्याला कोरोना संसर्ग झाल्यास, अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे वेगळे नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले..
हिवाळ्यात नाश्त्यासाठी तयार करा टेस्टी व्हेज स्प्रिंग रोल; ही आहे सोपी रेसिपी..
बाब्बो.. भारतात आले इतके सोने, दहा वर्षांचे रेकॉर्डही मोडले; पहा, एकाच वर्षात किती सोने खरेदी केलेय ?