हवामान अंदाज : कुठे होणार पाऊस, कुठे येणार थंडीची लाट; जाणून घ्या, पुढील दोन दिवसात कसे असेल हवामान ?
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले, की 9 जानेवारीपर्यंत उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारतात पाऊस पडेल आणि पुढील 6-7 दिवसांत उत्तरेत थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पश्चिम हिमालयीन भागात बुधवारी हलका-मध्यम पाऊस किंवा हिमवृष्टीची शक्यता आहे आणि 6 जानेवारी रोजी विखुरलेला पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते.
IMD ने सांगितले की, 6 जानेवारीपर्यंत पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 आणि 6 जानेवारी रोजी दक्षिण राजस्थान, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने असेही म्हटले आहे, की 5 जानेवारी म्हणजे आज बुधवारी पंजाब आणि हरियाणा आणि चंदीगडमध्ये आणि 6 जानेवारी रोजी पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात गारांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD नुसार, 7 ते 9 जानेवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, तथापि त्यानंतर या भागात बर्फवृष्टी कमी होईल. त्याच वेळी, जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद आणि त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये 8 आणि 9 जानेवारीला पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात गारा पडू शकतात.
दरम्यान, देशात काही ठिकाणी कडाक्याचा हिवाळा जाणवत आहे. त्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. असे असले तरी हवामान विभागाने काही राज्यात पाऊस होणार असल्याचेही म्हटले आहे. तसे पाहिले तर या काळात शक्यतो पाऊस होत नाही. मात्र, काही वर्षांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. कदाचित हा त्याचाच परिणाम असावा असेही सांगण्यात येत आहे.
Weather Update : पुढील चार दिवस दाट धुक्याचे..! पहा, देशात कोणत्या राज्यात कसे राहिल हवामान