मुंबई : कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा धोका वाढत असताना, भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीय.. कोरोनावरील अॅन्टी व्हायरल औषध भारतात दाखल झाले आहे. ‘मॉलफ्लू’ (मोलनुपिरावीर) असे या औषधाचे नाव आहे. या औषधाचा पाच दिवसांचा कोर्स रुग्णाला घ्यावा लागणार आहे.
अमेरिकेच्या फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने प्रौढांमधील सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोरोनावरील उपचारांसाठी, तसेच ज्यांना गंभीर आजार होण्याचा उच्च धोका आहे, त्यांच्यासाठी या ‘मॉलफ्लू’ औषधाच्या वापरास मंजुरी दिलीय. ‘मॉलफ्लू’च्या एका गोळीची किंमत 35 रुपये असून, पुढील आठवड्यापासून हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. सौम्य ते मध्यम संसर्ग असलेल्या कोरोना रुग्णांना या गोळ्यांच्या 5 दिवसांच्या कोर्ससाठी 1399 रुपये मोजावे लागणार आहेत.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने मॉलफ्लू (मोलनुपिरावीर) लाँच करीत असल्याची घोषणा हैदराबाद येथे केली. कोरोना रुग्णांची संख्या अधिक असलेल्या राज्यांना या औषधांचा पुरवठा प्राधान्याने केला जाणार असल्याचे डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यातर्फे सांगण्यात आले. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ पॅनेलने आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरासाठी अँटीव्हायरल औषध ‘मोलनुपिरावीर’ला मंजुरी दिली आहे.
‘मोलनुपिरावीर’सोबतच ‘सीडीएससीओ’ने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ‘कोवोव्हॅक्स’ आणि हैदराबादच्या बायोलॉजिकलच्या ‘कोरबीव्हॅक्स’ या लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. ‘मोलनुपिरावीर’ हे एक अॅण्टीव्हायरल औषध आहे, जे विशिष्ट ‘आरएनए’ व्हायरल होण्यास आळा घालते. हे औषध ‘SARS-CoV-2’द्वारे संसर्ग झालेल्यांमध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरले जाते..
औषधाची वैशिष्ट्ये
- ‘मोलनुपिरावीर’ औषधाचा 800 एमजीचा शिफारस केलेला डोस हा पाच दिवसांचा आहे. दिवसातून दोन वेळा या गोळ्या घ्याव्या लागणार आहेत.
- प्रत्येकी 200 मिली ग्रॅम असलेल्या 40 गोळ्या (कॅप्सूल) घेणे आवश्यक आहे.
- तोंडावाटे घेतल्या जाणाऱ्या या गोळीचे उत्पादन करण्यासाठी टोरेंट, सिप्ला, सन फार्मा, नॅटको, मायलॅन आणि हेटेरो यांसारख्या अनेक फार्मा कंपन्यांची प्रक्रिया सुरू आहे.
युरोपात कोरोनाचे थैमान.. तरीही ‘या’ देशात लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही; जाणून घ्या, काय आहे परिस्थिती ?
बापरे.. कोरोनाचा कंपन्यांनी घेतलाय धसका..! ‘त्यामुळे’ घेतलाय ‘हा’ महत्वाचा निर्णय; पहा, काय सुरू आहे कॉर्पोरेट विश्वात