मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही कोरोनाचा धसका घेतला आहे. त्यामुळे आयपीएलसाठी लिलाव कुठे होणार आणि कधी होणार, याबाबत आधिकृत काहीही माहिती दिली जात नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मोठा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये आयोजित केला जाईल. आता ही माहिती समोर येत आहे की कोविड-19 चा धोका लक्षात घेता बोर्ड लिलावासाठी पर्यायी जागा शोधत आहे.
लिलाव बेंगळुरू येथे न घेता अन्य ठिकाणी आयोजित करण्याचा विचार बोर्ड करत आहे. या ठिकाणी कोरोनामुळे सरकारने काही निर्बंध टाकले आहेत. बोर्डाने अद्याप बंगळुरूमधील हॉटेल बुक केलेले नाही. बोर्ड ज्या दोन हॉटेल्सचे बुकिंग करण्याचा विचार करत आहे, त्यांच्या मालकांनी काही काळ थांबण्यास सांगितले आहे. COVID-19 निर्बंधांमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांमुळे हॉटेल व्यावसायिकांनी बोर्डाला थांबण्यास सांगितले आहे.
कर्नाटक सरकार कोरोनाबाबत नवीन नियम जारी करणार आहे. त्यामुळे मोठ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. अशा स्थितीत हॉटेल आणि बोर्ड दोघांनाही नंतर त्रास होऊ शकतो. इनसाइडस्पोर्टने मंगळवारी याबाबत बीसीसीआय अधिकाऱ्या बरोबर चर्चा केली. अधिकाऱ्याने सांगितले, की काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत आणि आपण आता वाट पाहिली पाहिजे.
आमच्याकडे निर्बंधांबद्दल काही माहिती असल्यास बुकिंगची कोणतीही अडचण येणार नाही. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि राज्य संघटनांशी चर्चा करत आहोत. आम्हाला ठिकाण बदलायचे असल्यास, ते लिलावाच्या तारखांच्या आधी लगेच केले जाऊ शकते.
जर आयपीएल लिलावासाठी योग्य जागा ठिकाण मिळाले नाही, तर वेळापत्रकात बदल होऊ शकतो. बोर्डाने अद्याप तारखा जाहीर केलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत 12 आणि 13 फेब्रुवारीच्या तारखेत बदल होऊ शकतो. हा लिलाव 7 आणि 8 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होणार असल्याची बातमी पीटीआयने दिली होती. क्रिकबझ आणि इनसाइडस्पोर्टने अहवाल दिला, की लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या दोन वृत्तसंस्थेनंतर एएनआयने बोर्डाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, लिलाव बेंगळुरू किंवा अन्य शहरात आयोजित केला जाऊ शकतो. बीसीसीआयने सर्व राज्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनांना 17 जानेवारीपर्यंत खेळाडूंची अंतिम यादी पाठवण्यास सांगितले आहे. बोर्डाने 15 जानेवारीपूर्वी लिलावाच्या तारखा, ठिकाण आणि नियमांची अधिकृत घोषणा करणे अपेक्षित आहे.
IPL 2022 : क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर.. ‘हा’ स्टार खेळाडू पुन्हा आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता..